"मी कॅन्सरशी लढताना तिने अभ्यास केला", मुलीचा बारावीचा रिझल्ट पाहून शरद पोंक्षे झाले भावुक

शरद पोंक्षे यांना कॅन्सर झाला होता. त्यांच्या आजारपणाचं टेन्शन बारावीत असलेल्या त्यांच्या मुलीला होतं.

  • Share this:

मुंबई, 16 जुलै : महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल (maharashtra board hsc result 2020) जाहीर झाला आहे. दरवर्षी प्रमाणेच यंदाही मुलींनी बोर्डात अव्वल यश मिळवलं आहे. कॅन्सरवर मात केलेले अभिनेते शरद पोंक्षे यांची मुलगीही बारावीला होती. विज्ञात शाखेत असलेल्या त्यांच्या मुलाली 87% मिळालेत. मुलीचा हा रिझल्ट पाहून शरद पोंक्षे (Sharad ponkshe) भावुक झालेत. आपल्याला आजारापणाचं टेन्शन असूनही आपल्या मुलीने इतके गुण मिळाल्याने तिचा अभिमान वाटतो असं शरद पोंक्षे म्हणाले.

अभिनेते शरद पोंक्षे यांना कॅन्सर झाला होता. त्यांनी कॅन्सरवर यशस्वीरित्या मात केली आहे. मात्र त्यांच्या आजारपणाचं टेन्शन मुलीवर होतं. ती रुग्णालयात जाऊन अभ्यास करायची. अशा परिस्थितीतही तिनं यश संपादन केलं, त्यामुळे आपल्या मुलीचं त्यांनी कौतुक केलं आहे.  शरद पोंक्षे यांनी आपल्या फेसबुकवर पोस्ट केली आहे.

शरद पोंक्षे म्हणाले, "2019 साली माझे कर्करोगावरील उपचार चालू असताना, हाॅस्पिटलमध्ये येऊन काॅलेज अभ्यास करून एवढ्या टेन्शनमध्ये असतानाही पिल्लूने बारावी विज्ञान शाखेत 87% मार्क मिळवले, अभिमान वाटला मला. सतत वाईट बातम्या चहूबाजूंनी येत असताना एवढी चांगली बातमी सांगायला आनंद होतो आहे.

महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. मागच्यावर्षीच्या तुलनेमध्ये यंदाचा निकाल 4.78 टक्के अधिक लागल्याची माहिती बोर्डानं दिली आहे. कूण निकाल 90. 66 टक्के निकाल लागला आहे.

हे वाचा - दिवसा हॉटेलमध्ये काम, रात्री शाळेत अभ्यास, ह्या पठ्ठ्यानं 12 वी मिळवलं घवघवीत यश

दरवर्षी प्रमाणेच यंदाही मुलींनी बोर्डात अव्वल यश मिळवलं. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थिनींचा निकाल 93.88 टक्के आहे. तर विद्यार्थ्यांचा निकाल 88.04 टक्के आहे. म्हणजेच विद्यार्थिनींच्या निकालाची टक्केवारी विद्यार्थ्यांपेक्षा 5.84 टक्क्यांनी जास्त आहे मागील वर्षीच्या तुलनेत सर्वच शाखांचा निकाल वाढल्याचं पाहायला मिळत आहे.

हे वाचा - Maharashtra Board HSC Result 2020: रस्त्यावर विकली भाजी, वेळ मिळेल तेव्हा अभ्यास.

निकालानंतर गुणपडताळणी, पूनर्मूल्यांकन, उत्तरपत्रिकेची प्रत हवी असल्यास ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असल्यानं बोर्डाच्या कार्यालयात पालक-विद्यार्थ्यांनी येऊ नये असं आवाहन करण्यात आलं आहे. http://verification.mh-hsc.ac.in/ या वेबसाईटवर आपल्याला अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज 17 ते 27 जुलै दरम्यान विद्यार्थी किंवा पालकांना करता येणार आहे.

Published by: Priya Lad
First published: July 16, 2020, 7:32 PM IST
Tags: HSC Result

ताज्या बातम्या