Maharashtra Board HSC Result 2020 : कुठल्या शाखेचा निकाल सर्वाधिक? वाचा यंदाच्या निकालाची वैशिष्ट्यं

Maharashtra Board HSC Result 2020 : कुठल्या शाखेचा निकाल सर्वाधिक? वाचा यंदाच्या निकालाची वैशिष्ट्यं

यंदाच्या मुलांच्या तुलनेत विद्यार्थिनींच्या निकाला 5.84 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 16 जुलै: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. दरवर्षी प्रमाणेच यंदाही मुलींनी बोर्डात अव्वल यश मिळवलं तर विभागवार निकालात कोकण बोर्डाचा निकाल सर्वाधिक लागला आहे. मागच्यावर्षीच्या तुलनेमध्ये यंदाचा निकाल 4.78 टक्के अधिक लागल्याची माहिती बोर्डानं दिली आहे.

एकूण निकाल 90. 66 टक्के निकाल लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत सर्वच शाखांचा निकाल वाढल्याचं पाहायला मिळत आहे. बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थिनींचा निकाल 93.88 टक्के आहे. तर विद्यार्थ्यांचा निकाल 88.04 टक्के आहे. म्हणजेच विद्यार्थिनींच्या निकालाची टक्केवारी विद्यार्थ्यांपेक्षा 5.84 टक्क्यांनी जास्त आहे.

हे वाचा-HSC Result: ऑनलाईनच होणार व्हेरिफिकेशन, 'या' 4 पद्धतीने भरा शुल्क,बोर्डाचा इशारा

हे वाचा-गुणपडताळणी, उत्तरपत्रिका मागवण्याची प्रक्रिया ऑनलाईन, असा करा अर्ज

विज्ञान विभागाचा 96.93 टक्के निकाल लागला आहे. तर मागच्या वर्षी हा 92.60 टक्के होता. म्हणजेच 4.33 टक्क्यांनी यावर्षी वाढ झाली आहे. कला शाखेच्या निकालात 6.18 टक्क्यांनी चांगली वाढ झाली आहे. मागच्या वर्षी 76. 45 वरून यंदा 82.63 टक्के निकाल आला आहे. तर वाणिज्य शाखेचा यंदाचा निकाल 91.27 टक्के आला आहे. एमसीव्हीसीचा निकाल मागील वर्षीच्या तुलने 7.14 टक्क्यांनी वाढून 86.07 लागला आहे. यंदा विज्ञान शाखेचा निकाल सर्वात जास्त लागल्याचं पाहायला मिळात आहे.

कोकण विभागाचा सर्वात जास्त 95.89 तर औरंगाबाद विभागाचा 88.18 सर्वात कमी निकाल लागला आहे. यंदाच्या मुलांच्या तुलनेत विद्यार्थिनींच्या निकाला 5.84 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: July 16, 2020, 1:40 PM IST

ताज्या बातम्या