Home /News /career /

Maharashtra Board HSC Result 2020 : ऑनलाईनच होणार व्हेरिफिकेशन, 'या' 4 पद्धतीने भरा शुल्क, बोर्डाने दिला इशारा

Maharashtra Board HSC Result 2020 : ऑनलाईनच होणार व्हेरिफिकेशन, 'या' 4 पद्धतीने भरा शुल्क, बोर्डाने दिला इशारा

Maharashtra Board HSC Result 2020: दरवर्षी पालक-विद्यार्थी बोर्डाच्या कार्यालयात गर्दी करतात मात्र कोरोनामुळे यंदा सर्व प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे.

  मुंबई, 16 जुलै: कोरोना आणि लॉकडाऊनमुळे यंदा बारावीचा निकाल आणि त्याच्या पूनर्मूल्यांकनाची प्रक्रियाही ऑनलाईन होणार आहे. नुकताच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 12वीचा निकाल लागला. या निकालात दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकण विभागानं अव्वल यश मिळवत बाजी मारली आहे तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. बारावीचा निकाल विद्यार्थी आणि पालक mahresult.nic.in या ऑफिशियल वेबसाईटवर किंवा न्यूज 18 लोकमतवर हा निकाल पाहू शकता. निकालानंतर गुणपडताळणी, पूनर्मूल्यांकन, उत्तरपत्रिकेची प्रत हवी असल्यास ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असल्यानं बोर्डाच्या कार्यालयात पालक-विद्यार्थ्यांनी येऊ नये असं आवाहन करण्यात आलं आहे. Maharashtra Board HSC Result 2020 : बारावीचा निकाल इथे पाहा.
  http://verification.mh-hsc.ac.in/ या वेबसाईटवर आपल्याला अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज 17 ते 27 जुलै दरम्यान विद्यार्थी किंवा पालकांना करता येणार आहे. अर्ज भरल्यानंतर या प्रक्रियेसाठी ऑनलाईन शुल्काचे चारच पर्याय देण्यात आले आहेत. 1.डेबिट कार्ड 2. क्रेडिट कार्ड 3. UPI 4. नेट बँकिंग. याव्यतिरिक्त कोणत्याही पद्धतीनं पैसे स्वीकारले जाणार नसल्याची माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे. उत्तरपत्रिकेची छायाप्रत मिळवण्यासाठी आपल्याला 400 रुपये तर गुणपडताळणीसाठी 50 आणि पूर्नमूल्यांकनासाठी 300 रुपये भरावे लागणार आहेत. हे शुल्क ऑनलाईन स्वरुपात भरायचं आहे. त्यासाठी बोर्डाने कोणत्याही चार पद्धतीचा अवलंब करण्याचं आवाहन पालक-विद्यार्थ्यांना केलं आहे.
  Published by:Kranti Kanetkar
  First published:

  Tags: HSC

  पुढील बातम्या