Home /News /career /

HSC RESULT संदर्भात महत्त्वाची बातमी : महाराष्ट्र बोर्डाचे बारावीचे निकाल उद्या

HSC RESULT संदर्भात महत्त्वाची बातमी : महाराष्ट्र बोर्डाचे बारावीचे निकाल उद्या

महाराष्ट्र बोर्डाचे बारावीचे निकाल (class xii results) उद्या म्हणजे 16 जुलैला (HSC result 2020) जाहीर होणार आहेत.

    मुंबई, 15 जुलै : महाराष्ट्र राज्याचे (Maharashtra state board) बोर्डाचे बारावीचे निकाल (class xii results) उद्या म्हणजे 16 जुलैला (HSC result 2020) जाहीर होणार आहेत. दुपारी १ वाजता बोर्डाच्या वेबसाईटवर mahresult.nic.in यावर विद्यार्थ्यांना निकाल उपलब्ध होईल. Coronavirus च्या संसर्गामुळे महाराष्ट्र बोर्डाची दहावीची परीक्षा पूर्ण होऊ शकली नव्हती. पण बारावीचे मात्र सगळे पेपर साथीच्या प्रादुर्भावाअगोदर आणि लॉकडाऊनपूर्वीच झाले होते. उर्वरित परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर आता निकाल कधी लागेल याकडे विद्यार्थ्यांचं लक्ष होतं. News18Lokmat ला मिळालेल्या माहितीनुसार बोर्डाने बारावीच्या परीक्षेचे निकाल गुरुवारी दुपारी 1 वाजता जाहीर करायचं ठरवलं आहे. हे निकाल mahahsscboard.maharashtra.gov.in या वेबसाइटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. याशिवाय न्यूज 18 लोकमतच्या वेबसाइटवरही हा निकाल पाहता येणार आहे.
    या वर्षी इयत्ता बारावीच्या 13 लाखहून अधिक तर दहावीच्या 17 लाखहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. बारावीचे निकाल उद्या तर दहावीचे निकाल जुलै अखेरपर्यंत जाहीर केले जातील अशी माहिती मिळत आहे. केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे पेपर तपासण्यासाठी उशीर झाला. त्यामुळे निकाल लागण्यास विलंब होत असल्याचं सांगितलं जात आहे. CBSE बोर्डानं सोमवारी बारावीचे निकाल जाहीर केल्यानंतर आता आज दहावीचेही निकाल जाहीर केले आहेत. लॉकडाऊन आणि कोरोनामुळे उर्वरित परीक्षा रद्द केल्यानंतर CBSE बोर्डानं आज अखेर निकाल जाहीर केले आहेत. विद्यार्थी आपले निकाल CBSEच्या अधिकृत वेबसाइट cbse.nic.in, cbseresults.nic.in आणि results.nic.in वर पाहू शकतात.
    First published:

    Tags: 12th result, HSC

    पुढील बातम्या