मुंबई, 16 जुलै: महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शालांत परीक्षा अर्थात बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. News18 Lokmat च्या वेबसाईटवरही बोर्डाच्या परीक्षेचा निकाल अधिकृतपणे पाहता येईल. राज्याचा एकूण निकाल 90.66 टक्के लागला आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा निकाल 4.78 टक्क्यांनी वाढला असल्याची माहिती मिळाली आहे. कला शाखेचा निकाल 82.63, वाणिज्य शाखेचा 91.27 विज्ञान शाखेचा निकाल 96. 13 टक्के लागला आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही विभागानुसार कोकण बोर्डानं बाजी मारली आहे.
कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे पेपर तपासण्यासाठी उशीर झाल्यानं निकाल लांबल्याचं माहिती देण्यात आली आहे.
महाराष्ट्रात बारावीच्या निकालात पुन्हा एकदा कोकण विभागाने बाजी मारली आहे.
निकालाची एकूण टक्केवारी :90.66
कोकण विभाग (सर्वाधिक) : 95.89
नाशिक विभाग : 88.87
नागपूर विभाग : 91.65
मुंबई विभाग : 89.35
पुणे विभाग : 92.50
लातूर विभाग : 89. 79
अमरावती विभाग : 92.09
कोल्हापूर विभाग : 92. 42
औरंगाबाद विभाग: (सर्वाधिक कमी) 88.18
मागच्या वर्षी (2019) 14 लाख विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती. 2019 रोजी इयत्ता बारावीचा निकाल 85.88% लागला होता. मुलांच्या तुलनेत मागच्या वर्षी मुलींनी 7.85% टक्के अधिक बाजी मारली होती.
इयत्ता बारावीचा 2019 रोजी विभागानुसार पहिल्या क्रमांकावर कोकण बोर्ड होतं. कोकण बोर्डाचा निकाल 93.23%, पुणे, कोल्हापूर, अमरावती, औरंगाबद बोर्डाचा निकाल 87% टक्के लातूर विभागाचा 86 आणि नाशिक विभागाचा 84 टक्के निकाल लागला होता.
Published by:Kranti Kanetkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.