मुंबई, 16 जुलै: बारावीच्या विद्यार्थ्यांची अखेर प्रतीक्षा संपली. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीच्या परीक्षा निकाल जाहीर झाला आहे. हा निकाल विद्यार्थ्यांना mahresult.nic.in या ऑफिशियल वेबसाईटवर पाहता येणार आहे. कोरोनामुळे दहावी बारावीचे उर्वरित पेपर रद्द करण्यात आले होते. बारावीचा यंदाचा निकाल 90.66 टक्के लागला आहे. मागच्या वर्षीपेक्षा 4.78 टक्क्याने निकाल चांगला लागल्याची माहिती मिळाली आहे.
18 फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. राज्यभर एकूण 3 हजार 36 परीक्षा केंद्रांवर एकूण 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. ज्या बारावीच्या नोंदणी केली होती त्यांना हा निकाल SMS द्वारे देखील पाहता येणार आहे. याशिवाय examresults.net या संकेतस्थळावर आणि न्यूज 18 लोकमतच्या वेबसाईटवरही पाहू शकणार आहात.
कसा पाहायचा निकाल..
महाराष्ट्र बोर्डाच्या mahresult.nic.in अधिकृत संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर तिथे लिंकवर क्लिक करायचं आहे. तिथे तुम्हाला विचारलेले तपशील अपलोड करायचे आहेत. सीट नंबर, आईचं नाव इत्यादी. त्यानंतर तुम्हाला निकालाची एक प्रत समोर येईल. ही प्रत पीडीएफ फॉरमॅटमध्ये सेव्ह करून प्रिंट काढा.
राज्यातून विज्ञान शाखेसाठी 569,360 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी 5 लाख 18 हजार 598 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञान विभागाचा निकाल 91.08 टक्के लागला आहे. कला शाखेसाठी 481,288 विद्यार्थ्यांपैकी 350,128 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. कला शाखेचा निकाल 72.75 टक्के तर वाणिज्य 85.78 आणि एमसीव्हीसी शाखेचा 74.89 टक्के निकाल लागला आहे.
Published by:Kranti Kanetkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.