मुंबई, 16 जुलै: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालामध्ये निकालानंतर गुणपडताळणी, पूनर्मूल्यांकन, उत्तरपत्रिकेची प्रत हवी असल्यास ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन असल्यानं बोर्डाच्या कार्यालयात पालक-विद्यार्थ्यांनी येऊ नये असं आवाहन करण्यात आलं आहे.
http://verification.mh-hsc.ac.in/ या वेबसाईटवर आपल्याला अर्ज करावा लागणार आहे. हा अर्ज 17 ते 27 जुलै दरम्यान विद्यार्थी किंवा पालकांना करता येणार आहे.
अर्ज भरल्यानंतर या प्रक्रियेसाठी ऑनलाईन शुल्काचे चारच पर्याय देण्यात आले आहेत. डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, UPI, नेट बँकिंग याव्यतिरिक्त कोणत्याही पद्धतीनं पैसे स्वीकारले जाणार नाहीत.
पुनर्मूल्यांकन करण्यासाठी उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेण आवश्यक आहेत. त्यानंतर कार्यालयीन कामाच्या दिवसांत अर्ज करायचा आहे. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीनं 300 रुपये शुल्क भरून अर्ज करणं आवश्यक आहे. या वेबसाईटवर पुनर्मूल्यांकनबाबत सूचना आणि अटी देण्यात आल्या आहेत. ऑनलाईन अर्ज आणि शुल्क भरणं अनिवार्य आहे. ही सुविधा निकाल लागल्यानंतर 7 दिवस असणार आहे. विभागीय मंडळाच्या हेल्पलाईनवरही याबाबत माहिती मिळू शकते.
Published by:Kranti Kanetkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.