मुंबई, 07 मे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (MSBCHSE) दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जुनच्या दुसऱ्या आठवड्यात निकाल लागतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. शिक्षकांचं पेपर तपासण्याचं काम सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. कोरोना व्हायरसमुळे दहावी आणि बारावीचे शेवटचे पेपर स्थगित करण्यात आले होते. बोर्डाकडून पेपर तपासण्याचं काम सुरू झाल्याची माहिती मिळत आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात मूल्यांकन पूर्ण होऊन दुसऱ्या आठवड्यात निकाल जाहीर करण्यात येईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. साधारण 10 जूनपर्यंत निकाल येईल असा कयास व्यक्त केला जात आहे. हा निकाल विद्यार्थी mahresults.nic.in या वेबसाईटवर पाहू शकतात.
अत्यावश्यक सेवांसोबतच बोर्डाचे पेपर तपासण्यासाठी शिक्षकांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे आरोग्य सेवा, पोलीस, डॉक्टर, पालिकेच्या कर्मचाऱ्यांसोबत शिक्षकही आपलं कर्तव्य निभावत आहेत. पेपर तपासण्याचं काम सुरू झालं आहे. त्यामुळे जूनच्या पहिल्या दोन आठवड्यात निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
हे वाचा-वडिलांना झाला कॅन्सर, अवघ्या 22 व्या वर्षी तरुणीनं IAS परीक्षेत मिळवलं अव्वल यश
सध्या कोरोना व्हायरसमुळे शाळा, महाविद्यालयं बंद आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर युजीसीनं शिफारस केल्याप्रमाणं यंदाचं शैक्षणिक वर्ष सप्टेंबर ते जुलै असं करण्याचा विचार सुरू आहे. उदय सामंत म्हणाले, पदवीच्या प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या परीक्षा या 1 जुलै ते 15 जुलै 2020 दरम्यान घेण्यात याव्यात तसेच बारावी नंतरचा प्रवेश लवकरात लवकर देऊन 1 सप्टेंबर 2020 पासून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरूवात करावी, असा सूचना आयोगाकडून प्राप्त झाल्या आहेत. परीक्षा आणि पुढील शैक्षणिक वर्ष याचे वेळापत्रक तयार करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.
हे वाचा-एकेकाळी रस्त्यावर विकायचा बांगड्या...जिद्दीच्या जोरावर आज आहे IAS ऑफिसर
संपादन- क्रांती कानेटकर
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.