• Home
  • »
  • News
  • »
  • career
  • »
  • Maharashtra Board 12th Result: News18लोकमतच्या वेबसाईटवर बघता येणार निकाल; इथे करा क्लिक

Maharashtra Board 12th Result: News18लोकमतच्या वेबसाईटवर बघता येणार निकाल; इथे करा क्लिक

बारावीचा निकाल तुम्ही News18लोकमतच्या वेबसाईटवरही बघू शकणार आहात

  • Share this:
    मुंबई, 03 ऑगस्ट: राज्याच्या शालेय शिक्षण मंडळाकडून काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे न झालेल्या ऐतिहासिक अशा दहावीच्या परीक्षेचा निकाल (Maharashtra SSC result 2021) जाहीर करण्यात आला. मात्र आता दहावीनंतर बारावीच्या निकालाकडे (Maharashtra 12th result date) सर्वांचं लक्ष लागलं होतं. महाराष्ट्र बोर्डाच्या इयत्ता 12 वीचा निकाल ऑगस्ट (August) महिन्याच्या पहिला आठवड्यात लागणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यानुसार आता बारावीच्या निकालाची तारीख (Maharashtra HSC Result 2021 date and time) जाहीर करण्यात आली आहे. आज म्हणजेच 03 ऑगस्टला दुपारी 4 वाजता बारावीचा निकाल जाहीर होणार अशी घोषणा करण्यात आली आहे.  आता हा बारावीचा निकाल (HSC Result 2021 Maharashtra board website) तुम्ही News18लोकमतच्या वेबसाईटवरही (12th result on News18lokmat) बघू शकणार आहात. यासाठी तुम्हाला या बातमीत दिलेल्या बोर्डाच्या निकालामध्ये आपली माहिती भरावी लागणार आहे.
    बोर्डाने mh-hsc.ac.in या अधिकृत वेबसाइटवर विद्यार्थ्यांचे रोल नंबर आणि सीट नंबर जारी केले आहेत. (Maharashtra HSC Results 2021) कोरोनामुळे बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रे देण्यात आली नाहीत. आता विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी, बोर्डाने HSC रोल नंबर / सीट नंबर तपासण्यासाठी लिंक अॅक्टिव्ह केली आहे. असं होणार मूल्यांकन दहावीप्रमाणे बारावीचा निकालही विशेष मूल्यांकन पद्धतीनं (Special Assessment system) लावण्यात येणार आहे. 40:30:30 या फॉर्म्युल्यानुसार निकाल लावण्यात येणार आहे. यात विद्यार्थ्यांच्या दहावी आणि अकरावीच्या मार्कांना प्रत्त्येकी 30 टक्के वेटेज आहे. तसंच बारावीच्या वर्षांतील अंतर्गत परीक्षा, असायमेन्टस यांना 40 टक्के वेटेज असणार आहे. यावरून विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार आहे. दहावीच्या निकालादरम्यान विद्यार्थ्यांना निकाल बघण्यास झालेली अडचण बघता बारावीच्या निकालाच्या (Result MH HSC ac in 2021) दिवशी अशी अडचण विद्यार्थ्यांना येणार नाही असा प्रयत्न राज्य सरकारचा असणार आहे. हा निकाल News 18 लोकमतच्या वेबसाईटवर तुम्हाला बघता येणार आहे.
    Published by:Atharva Mahankal
    First published: