मुंबई, 16 जुलै: कोरोना आणि लॉकडाऊनमुळे बारावीचा निकाल लागण्यासाठी काहीसा विलंब झाला. अखेर बारावीच्या विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली असून महाराष्ट्र बोर्डाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा आज निकाल लागणार आहे. दुपारी 1 वाजता हा HSC result जाहीर होईल आणि तो विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येईल. HSC बोर्डाच्या mahresult.nic.in या वेबसाईटवर दुपारी 1 वाजल्यानंतर निकाल पाहू शकाल. याशिवाय News18 Lokmat च्या वेबसाईटवरही निकाल पाहता येणार आहे.
महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीची परीक्षा 20 फेब्रुवारी ते 23 मार्च या काळात घेतली होती. या वर्षी इयत्ता बारावीच्या 13 लाखहून अधिक तर दहावीच्या 17 लाखहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे पेपर तपासण्यासाठी उशीर झाला. त्यामुळे निकाल लागण्यास विलंब होत असल्याचं सांगितलं जात आहे.
न्यूज 18 लोकमतवर इथे पाहा बारावीचा निकालकसा पाहायचा निकाल
न्यूज 18 लोकमतवर निकाल पाहणार असाल तर इथे आपल्याला बारावी सिलेक्ट करायचं आहे. तुमचं नाव, मोबाई नंबर, ई-मेल अपलोड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला निकाल पाहता येणार आहे. याशिवाय आपल्याला mahresult.nic.in , mahahsscboard.maharashtra.gov.in वेबसाईटवर निकाल पाहता येणार आहे.
बारावीचा निकाल आपल्याकडे इंटरनेट नसेल तर SMS द्वारेही पाहता येणार आहे. त्यासाठी आपल्याला बोर्डाकडून जो SMS आला असेल तशा फॉरमेटमध्ये आपला सीट नंबर आणि इतर डिटेल्स SMS द्वारे पाठवले तर आपला निकाल मिळू शकणार आहे.
Published by:Kranti Kanetkar
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.