मुंबई, 03 ऑगस्ट: कोरोनामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा (10th and 12th exams) राज्य शासनाकडून रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Minister Varsha Gaikwad) यांनी बारावीचा निकाल (Maharashtra 12th Result) आज 03 ऑगस्टला जाहीर होण्याची घोषणा केली होती. अखेर बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार राज्याच्या शालेय शिक्षण मंडळाकडून बारावीच्या निकालाबाबत सर्व माहिती देण्यात आली आहे.
ऐतिहासिक निकालाची वैशिष्ट्य
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल (Maharashtra HSC Result 2021) यंदा 99.63 टक्के लागला आहे. यंदा राज्यातील एकूण 13 लाख 80 हजार विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी (HSC Result 2021 Maharashtra board website) नोंदणी केली. या विद्यार्थ्यांची परीक्षा कोरोनामुळे रद्द करण्यात करण्यात आली होती. यंदा विज्ञान शाखेचा 99.55 टक्के निकाल लागला आहे. कला शाखेचा 99.83 टक्के तर वाणिज्य शाखेचा 99 .91 तयेक निकाल लागला आहे.
एकूण निकाल (HSC Result 2021 Maharashtra Pass Percentage)
राज्याच्या एकूण विभागांपैकी कोकण या विभागाचा निकाल सर्वात 99.81 टक्के लागला आहे. तर सर्वात कमी निकाल औरंगाबाद या विभागाचा 99.34 टक्के लागला आहे.
राज्यात एकूण 100 टक्के निकाल असणारी विद्यालये 6542 आहेत.
राज्यात (Maharashtra HSC Result 2021 live Updates ) तब्बल 46 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. तर 35 टक्के गुण ।मिळालेले 12 विद्यार्थी आहेत.
गेल्या वर्षी पेक्षा विज्ञान शाखेचा निकाल 2.52 टक्के जास्त लागला आहे. तर कला शाखेचा निकाल 17.20 टक्के जास्त लागला आहे. वाणिज्य शाखेचा निकाल 8.64 टक्के जास्त लागला आहे. उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमचा निकाल 12.93 टक्के अधिक लागला आहे.
यंदाच्या निकालात विद्यार्थिनींचाच डंका आहे. विद्यार्थीनीचा निकाल 99.73 टक्के इतका आहे तर विद्यार्थ्यांचा निकाल 99.54 इतका आहे. म्हणजेच 0.19 टक्के नी मुलींनी बाजी मारली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Exam result, HSC, Maharashtra