मुंबई, 09 ऑगस्ट: महाराष्ट्रातील प्रथम वर्ष कनिष्ठ महाविद्यालय प्रवेश 2022 साठी अर्ज प्रक्रिया सुरू आहे. पर्याय फॉर्म भाग दोन भरण्याची आज शेवटची तारीख आहे. अशा परिस्थितीत प्रवेश घेण्यास इच्छुक असलेले विद्यार्थी अधिकृत वेबसाइट 11thadmission.org.in वर जाऊन अर्ज करू शकतात. FYJC प्रवेश 2022 साठी पर्याय फॉर्म 2 आज रात्री 10 वाजता पर्यंत भरता येणार आहे.
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा म्हणेजच भाग-I 30 मे पासून सुरू झाला. या तारखेपासून 11 वीमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणारे विद्यार्थी ऑनलाईन नोंदणी (Class 11th Online Admission) सुरू करू शकत होते. तसेच दहावीचा निकाल (Class 10 Results) जाहीर झाल्यानंतर या अर्जाचा दुसरा टप्पा म्हणजेच भाग-II भरता येणार होता. त्यानुसार CBSE च्या निकालानंतर हा दुसरा टप्पा सुरु झाला. त्यानुसार आज दुसऱ्या टप्प्यातील नोंदणी करण्याची शेवटची तारीख आहे.
तब्बल 75,000 रुपये पगार आणि बऱ्याच सुविधा; संरक्षण मंत्रालय मुंबईत करतंय भरती; लगेच करा अप्लाय
अशा पद्धतीनं भारत येईल फॉर्म
महाराष्ट्र इयत्ता 11वी प्रवेशासाठी पर्याय फॉर्म भाग दोन भरण्यासाठी, उमेदवारांना प्रथम अधिकृत वेबसाइट 11thadmission.org.in वर क्लिक करा.
होम पेजवर तुम्हाला विद्यार्थी नोंदणी लॉगिनच्या लिंकवर क्लिक करावे लागेल.
एक नवीन पृष्ठ उघडेल. येथे लॉगिन तपशील भरून सबमिट करा.
विद्यार्थ्यांना आता महाराष्ट्र FYJC पर्याय फॉर्म भाग II भरावा लागेल आणि सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील.
फॉर्म भरल्यानंतर त्याची प्रिंट काढा.
पहिल्या टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांनी आपली माहिती भरली होती. त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांना त्यांचे मार्क्स आणि गुणपत्रिका अपलोड करायची आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर करण्यात येणार आहे. यंदा CBSE चा निकाल अधिक लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात स्पर्धा बघायला मिळणार आहे.
Interview दरम्यान या 4 चुका ठरतील घातक; मुलाखत सुरु होण्याआधीच व्हाल रिजेक्ट
यंदा सायन्स पेक्षा आर्ट्स ला मागणी
सायन्स क्षेत्रातील कमी होत चाललेल्या नोकऱ्या. सायन्समध्ये शिक्षण होऊन पदवी प्राप्त करूनही नोकरी नाही असे अनेकजण आहेत. टेक्नॉलॉजी कितीही पुढे जात असली तरी सायन्स क्षेत्रात पदवीनंतर नोकरीला कमी झाल्या आहेत हे सत्य आहे. अनेक तरुण बेरोजगार आहेत. त्या तुलनेने आर्ट्सक्षेत्रात खूप पर्याय उपलब्ध असतात. त्यामुळे विद्यार्थ्यांना नोकरी मिळू शकते. म्हणूनही आर्टस् कडे विद्यार्थ्यांचा अधिक कल असण्याची शक्यता आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Career opportunities, Education, Maharashtra News