Maharashtra 11th Admission CET: विद्यार्थ्यांनो, परीक्षेसाठी 'असं' करा रजिस्ट्रेशन; लिंकवर करा क्लिक

या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे

या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे

  • Share this:
    मुंबई, 19 जुलै: कोरोनामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा (10th and 12th exams) राज्य शासनाकडून रद्द करण्यात आल्या होत्या. त्यानंतर राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Minister Varsha Gaikwad) यांनी दहावीचा निकाल (10th Result) लागल्यानंतर अकरावीच्या (11th Admissions) प्रवेशासाठी CET (Common Entrance Test) म्हणजेच प्रवेश परीक्षा घेण्यात येईल अशी घोषणा केली होती. त्यानुसार आता ही परीक्षा 21 ऑगस्टला होणार आहे. मात्र यासाठीची नोंदणी प्रक्रिया आजपासून म्हणजेच 20 जुलैपासून सुरू झाली आहे. CET  म्हणजेच अकरावीची प्रवेश परीक्षा विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना जुनिअर कॉलेजमध्ये (Junior College) प्रवेश घ्यायचा आहे त्यांच्यासठी ही परीक्षा असणार आहे. ही परीक्षा पूर्णपणे दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. या परीक्षेच्या मार्क्सवरच विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश मिळू शकणार आहे. अकरावीमध्ये प्रवेशासाठी घेण्यात येणारी CET परीक्षा 21 ऑगस्ट 2021 ला सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत होणार आहे. ही परीक्षा ऑफलाईन असल्यामुळे परीक्षाकेंद्रांची यादी लवकरच जाहीर होणार आहे. तत्पूर्वी या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन (CET online registration) करावं लागणार आहे. हे वाचा - CBSE 10th Result: 10वीच्या निकालाबाबत मोठी अपडेट; रोल नंबरशिवाय बघता येणार निका असं करा रजिस्ट्रेशन   http://cet.mh-ssc.ac.in/ वर महाराष्ट्र CET 2021 ची अधिकृत वेबसाइट ओपन करा. . ड्रॉप डाउन मेनूमधून 'बोर्ड टाईप' (Board Type) निवडा. नाव, संपर्क क्रमांक (Contact detail), जन्म तारीख, पत्ता आणि शिक्षणाचं माध्यम (Medium of Education) यासारख्या नोंदणीसाठी आवश्यक सर्व माहिती भरा. त्यानंतर जिल्हा आणि तालुका निवडून परीक्षा केंद्राची माहिती (examination centers list) निवडा. फोटो, स्वाक्षरी (Sign), आयडी प्रूफ (ID proof) आणि काही असल्यास अपंग पुरावा अपलोड करा. इतर सर्व औपचारिकता पूर्ण करा आणि सबमिट वर क्लिक करा. भविष्यातील संदर्भासाठी अप्लिकेशनचं  एक प्रिंट आउट घ्या.
    Published by:Atharva Mahankal
    First published: