मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

विद्यार्थ्यांनो, 'या' तारखेला सुरू होणार दहावी आणि बारावीची पुरवणी परीक्षा; शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केली तारीख

विद्यार्थ्यांनो, 'या' तारखेला सुरू होणार दहावी आणि बारावीची पुरवणी परीक्षा; शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केली तारीख

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Minister Varsha Gaikwad) यांनी याबद्दल ट्विट करून माहिती दिली आहे.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Minister Varsha Gaikwad) यांनी याबद्दल ट्विट करून माहिती दिली आहे.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Minister Varsha Gaikwad) यांनी याबद्दल ट्विट करून माहिती दिली आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 28 ऑगस्ट: कोरोनामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा (10th and 12th exams) रद्द करण्यात आल्यात. यंदा दहावीची आणि बारावीचा निकाल (10th and 12th Result) विशेष मूल्यांकन पद्धतीनं लावण्यात आला. मात्र या निखळत उत्तीर्ण न होऊ शकलेले आणि ATKT साठी पात्र असलेले विद्यार्थी आता पुन्हा परीक्षा देऊ शकणार आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा (SSC HSC Supplementary Exam 2021) घेण्यात येणार आहे. या पुरवणी परीक्षा (Supplementary Exam 2021 Dates) सुरु होण्याची तारीख शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून जाहीर करण्यात आली आहे.

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Minister Varsha Gaikwad) यांनी याबद्दल ट्विट करून माहिती दिली आहे. ज्या विद्यार्थ्यांचा निकाल जहीर होऊ शकला नाही किंवा ज्या विद्यार्थ्यांनी पुन्हा परीक्षा देण्यासाठी पुरवणी परीक्षेचा (10th and 12th Supplementary Exam 2021) अर्ज भरला आहे अशा विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येणार आहे. यासाठी दहावी आणि बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर क्लरण्यात आलं आहे. तसंच त्या आधी होणाऱ्या प्रात्यक्षिक परीक्षेच्या तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत.

हे वाचा - Nagpur Job Alert: भारतीय विद्या भवन नागपूर इथे 'या' पदांसाठी होणार भरती

दहावीची पुरवणी परीक्षा ही येत्या 22 सप्टेंबरपासून 8 ऑक्टोबर या दरम्यान घेण्यात येणार आहे.  तर बारावीची पुरवणी परीक्षा ही 16 सप्टेंबर ते 11 ऑक्टोबर या कालावधीत घेण्यात येणार आहे. तसंच बारावीच्या व्यावसायिक अभयसक्रमाची पुरवणी परीक्षाही 16 सप्टेंबरपासून 8 ऑक्टोबरपर्यंत घेण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे.

कधी होणार प्रात्यक्षिक परीक्षा

दहावीची तोंडी परीक्षा आणि पात्याक्षिक परीक्षा 21 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या दरम्यान घेण्यात येणार आहे. तसंच बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा 15 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर या दरम्यान घेतली जाणार आहे.  अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे.

First published:

Tags: Board Exam, HSC, Ssc board