Home /News /career /

महानिर्मिती भरती: औष्णिक वीजनिर्मिती केंद्र चंद्रपूर इथे 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती; 'या' तारखेपासून सुरु होणार अर्ज

महानिर्मिती भरती: औष्णिक वीजनिर्मिती केंद्र चंद्रपूर इथे 12वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी भरती; 'या' तारखेपासून सुरु होणार अर्ज

डेटा एंट्री ऑपरेटर या पदांसाठी ही भरती (Data entry Operator jobs) असणार आहे.

    चंद्रपूर, 12 ऑक्टोबर: औष्णिक वीजनिर्मिती केंद्र चंद्रपूर (Thermal Power Station Chandrapur) इथे लवकरच 12वी उत्तीर्ण उमेदवारांच्या 144 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Mahanirmiti Chandrapur Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. डेटा एंट्री ऑपरेटर या पदांसाठी ही भरती (Data entry Operator jobs) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. यासाठी अर्ज हे 15 ऑक्टोबर  2021 पासून सुरु करण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑक्टोबर  2021 असणार आहे. या पदांसाठी भरती    डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) - एकूण जागा 144 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव   डेटा एंट्री ऑपरेटर (Data Entry Operator) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी डेटा एंट्रीसाठी टायपिंगचं शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. त्यासोबतच कंप्यूटरचं ज्ञान असणं आवश्यक आहे. हे वाचा- Government Jobs: राज्य आरोग्य हमी सोसायटी मुंबई इथे 80,000 रुपये पगाराची नोकरी अर्ज सुरु होण्याची तारीख - 15 ऑक्टोबर  2021 अर्ज करण्याची शेवटची तारीख - 25 ऑक्टोबर  2021 या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.mahagenco.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. हे वाचा- जिल्हाधिकारी कार्यालय बुलढाणा इथे सरकारी वकील पदासाठी जागा रिक्त सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेत भरती सांगली-मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेत (Sangli Miraj Kupwad Mahanagarpalika Recruitment 2021) 10वी पास उमेदवारांसाठी लवकरच काही भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Sangli Miraj & Kupwad City Municipal Corporation) जारी करण्यात आली आहे. प्रजनन तपासक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2021 असणार आहे. या भरतीसाठी अप्लाय करण्यासाठी आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.
    First published:

    Tags: Jobs, Mseb

    पुढील बातम्या