मुंबई, 04 ऑगस्ट: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं (MAHA TET 2021) महाराष्ट्र TET 2021 ची तारीख जाहीर केली आहे. जे उमेदवार शिक्षक होण्याचं स्वप्न पाहत आहेत ते ही परीक्षा पास करून आपल्या ध्येयाकडे एक पाऊल टाकू शकतात. राज्यातील पहिली ते आठवीच्या शिक्षकांच्या भरतीसाठी ही परीक्षा घेतली जाणार आहे. मात्र अजूनही उमेदवारांना या परीक्षेविषयी (MahaTET exam date) आणि रजिस्ट्रेशनविषयी (MahaTET registration) अनेक प्रश्न पडले आहेत. मात्र आज आम्ही सर्व उमेदवारांच्या शंकांचं निरसन करणार आहोत.
या पदासाठी भरती
शिक्षक (Teacher) - इयत्ता 1ली ते 5वी (Paper I)
शिक्षक (Teacher) - इयत्ता 6वी ते 8वी (Paper II)
शैक्षणिक पात्रता
इयत्ता 1ली ते 5वी (Paper I) - उमेदवार 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आणि D.T.ED पदवी आवश्यक.
इयत्ता 6वी ते 8वी (Paper II) - उमेदवार 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आणिB.A.Ed./B.Sc.Ed. पदवी आवश्यक.
हे वाचा - IDBI Bank Recruitment 2021: IDBI बँकेत तब्बल 920 जागांसाठी भरती; असं करा अर्ज
परीक्षा शुल्क
सर्वसाधारण उमेदवारांसाठी
Paper I किंवा Paper II - 500/- रुपये
Paper I किंवा Paper II दोनही - 800/ रुपये
अनु.जाती, अनु.जमाती आणि अपंगांसाठी
Paper I किंवा Paper II - 250/- रुपये
Paper I किंवा Paper II दोनही - 400/ रुपये
परीक्षेची तारीख
पेपर I- 10 ऑक्टोबर 2021 (सकाळी 10:30 ते दुपारी 01:00 )
पेपर II -10 ऑक्टोबर 2021 (दुपारी 02:00 ते दुपारी 04:30 )
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी https://drive.google.com/file/d/142p-EJNO4hXRIjYhkwJ-RKC4oTBPJjF4/view या वेबसाईटवर जाऊ शकता.
या पदभरतीसाठी https://mahatet.in/ या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अप्लाय करू शकता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Exam, Maharashtra, School teacher