Home /News /career /

महाराष्ट्र रियल इस्टेट नियामक प्राधिकरण इथे 'या' उमेदवारांना नोकरीची संधी; इतका मिळणार पगार

महाराष्ट्र रियल इस्टेट नियामक प्राधिकरण इथे 'या' उमेदवारांना नोकरीची संधी; इतका मिळणार पगार

अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जुलै 2021 असणार आहे.

    मुंबई , 28 जुलै:   महाराष्ट्र रियल इस्टेट नियामक प्राधिकरण (Maha RERA Recruitment 2021) इथे लवकरच पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. कनिष्ठ कायदे सल्लागार या पदासाठी ही भरती असणार आहे.  पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख  30 जुलै 2021 असणार आहे. या पदासाठी भरती कनिष्ठ कायदे सल्लागार (Jr. Legal Consultant) शैक्षणिक पात्रता या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं  LLB पर्यंत शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना 05 वर्षांचा अनुभव असणंही आवश्यक आहे. हे वाचा -  टाटा मोटर्स पुणे इथे 10वी पास उमेदवारांसाठी मोठी पदभरती; आताच इथे करा अप्लाय इतका मिळणार पगार कनिष्ठ कायदे सल्लागार (Jr. Legal Consultant) - 35,000/- रुपये प्रतिमहिना अर्ज पाठवण्याचा ई-मेल आयडी - techoff2@maharera.mahaonline.gov.in अर्ज करण्याची शेवटची तारीख -  30 जुलै 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा. 
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Jobs, Maharashtra

    पुढील बातम्या