मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

MAHA MMB Recruitment: महाराष्ट्र सागरी मंडळ मुंबई इथे काही पदांसाठी नोकरीची संधी; असं करा अप्लाय

MAHA MMB Recruitment: महाराष्ट्र सागरी मंडळ मुंबई इथे काही पदांसाठी नोकरीची संधी; असं करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई,16 नोव्हेंबर: महाराष्ट्र सागरी मंडळ मुंबई (The Maharashtra Maritime Board) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (MAHA MMB Mumbai Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफ;लाईन किंवा ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

या जागांसाठी भरती

उपसंचालक समन्वय (Deputy Director Coordination)

वित्त व्यवस्थापक (Finance Manager)

MIS अधिकारी (MIS Officer)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

उपसंचालक समन्वय (Deputy Director Coordination) - कोणत्याही शेखेत डिग्री घेतली असणं आवश्यक. तसंच 10 वर्षांचा अनुभव आवश्यक.

वित्त व्यवस्थापक (Finance Manager) - कॉमर्समध्ये डिग्री घेतली असणं आवश्यक. तसंच 10 वर्षांचा अनुभव आवश्यक.

MIS अधिकारी (MIS Officer) - संबंधित पदांमध्ये शिक्षण आवश्यक. तसंच अनुभव आवश्यक.

इतका मिळणार पगार

उपसंचालक समन्वय (Deputy Director Coordination) - 45,000/- रुपये प्रतिमहिना

वित्त व्यवस्थापक (Finance Manager) - 45,000/- रुपये प्रतिमहिना

MIS अधिकारी (MIS Officer) - 75,000/- रुपये प्रतिमहिना

PCMC Recruitment 2021: पिंपरी चिंचवड महानगरपालिका इथे भरती; 75,000 रुपये पगार

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड, इंडियन मर्कन्टाइल चेम्बर्स. 2 रा मजला, रामजीभाईकमानी मार्ग, बेलार्ड इस्टेट, मुंबई – 400001 / esstteeommb@gmail.com With c/c admin.pmu.mmb@gmail.com.

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 29 नोव्हेंबर 2021

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://mahammb.maharashtra.gov.in/1035/Home या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:

Tags: Career opportunities, जॉब