वर्ष वाया नको जायला! 85 किमी सायकल चालवत परीक्षेला पोहोचला बाप अन् मुलगा

पोरासाठी बापानं चालवली 85 किमी सायकल, 15 मिनिटं आधी पोहोचले परीक्षा केंद्रावर

पोरासाठी बापानं चालवली 85 किमी सायकल, 15 मिनिटं आधी पोहोचले परीक्षा केंद्रावर

  • Share this:
    भोपाळ, 20 ऑगस्ट : बाप आपल्या मुलासाठी काहीही करतो. मुलाचे हट्ट पुरवण्यापासून ते त्याला गरज असणाऱ्या गोष्टीपर्यंत. एकवेळ स्वत:ची गैरसोय करून कष्ट काढून जगतो. अशाच एका वडिलांची चर्चा सध्या होत आहे. मुलाचं वर्ष फुकट जाऊ नये आणि परीक्षा चुकू नये म्हणून लॉकडाऊनच्या काळात 85 किमी अंतर कापात मुलाला वेळेत परीक्षेला पोहोचवलं आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ पासून 250 किमी दूर धार जिल्ह्यात ही घटना समोर आली आहे. दहावीची पुरवणी परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्याला 85 किमी दूर जावं लागणार होतं. यासाठी कोणतीच बस आणि गाडी लॉकडाऊनमुळे उपलब्ध होत नव्हती. अशावेऴी मुलाचं वर्ष वाया जाऊ नये आणि त्याचा पेपर चुकू नये म्हणून सकाळीच सायकलला पँडल मारलं आणि वडिल-मुलगा दोघंही परीक्षा केंद्राच्या दिशेनं निघाले. हे वाचा-सरकारी नोकरीसंदर्भात मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय; आता होणार सामायिक परीक्षा 'रुक जाना नहीं' अभियानांतर्गत 10वी आणि 12 वीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी दिली जात आहे. मंगळवारी गणिताचा पेपर होता. शोभाराम यांचा मुलगा आशिष याला तीन पेपर द्यायचे होते. परीक्षा केंद्र घरापासून 85 किमी लांब होतं. कोरोनाचा वाढता संसर्ग वाढत असल्यानं बससेवा बंद होती. त्यामुळे परीक्षा केंद्रावर पोहोचणं कठीण होतं. वडिलांनी या मुलाला वेळेआधी परीक्षा केंद्रावर 85 किमी सायकलचा प्रवास करून पोहोचवल्यानं त्यांचं कौतुक होत आहे.
    Published by:Kranti Kanetkar
    First published: