'बाबा का ढाबा'नंतर मुंबईचा लिट्टी-चोखावाला सोशल मीडियावर व्हायरल; छोटंसं दुकान सुरू ठेवण्यासाठी धडपड

'बाबा का ढाबा'नंतर मुंबईचा लिट्टी-चोखावाला सोशल मीडियावर व्हायरल; छोटंसं दुकान सुरू ठेवण्यासाठी धडपड

मुंबईत लिट्टी-चोखा (Mumbai litti-choka) विकणाऱ्या या तरुणासाठीही झोमॅटो सरसावला आहे.

  • Share this:

मुंबई, 18 मार्च : सोशल मीडिया (Social Media) हे असा प्लॅटफॉर्म आहे ज्या ठिकाणी तुम्हाला असे काही व्हिडिओ आणि फोटो पाहायला मिळतात. ज्या माध्यमातून तुमचं मनोरंजन होतं किंवा तुमच्या मनाला स्पर्श करणाऱ्या गोष्टी पाहायला मिळतात. या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक लोकांना ओळख आणि प्रसिद्धीसुद्धा मिळाली आहे. 'बाबा का ढाबा'च्या (Baba Ka Dhaba) कहाणीनंतर सोशल मीडियावर अशाच प्रकारचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले. या माध्यमातून नेटिझन्सनी छोटा व्यवसाय करणाऱ्यांना मदत करण्याचं आवाहन केलं आणि त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली.

सध्या सोशल मीडियावर बाबा का ढाबानंतर मुंबईच्या लिट्टी-चोखावाल्याची (Litti-Chokha) कहाणी तुफान व्हायरल होत असून त्याची जोरदार चर्चा होत आहे. एका ट्वीटर युझरने या लिट्टी-चोखावाल्याने आपला व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी कसे प्रयत्न केले हे दाखवलं. पण सध्या आर्थिक संकटात असलेल्या लिट्टी-चोखावाल्याने आपलं दुकान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला मदत करण्याचे आवाहन या ट्वीटर युझरने केलं आहे.

ट्विटर युझर प्रियांशू द्विवेदी (Priyanshu Dwibedi ) याने लिट्टी-चोखा विकणाऱ्या एका तरुणाचा व्हिडिओ पोस्ट करत मदतीचे आवाहन केले आहे. त्यानं ट्विटमध्ये असं म्हटलं आहे की, 'या तरुणाचं नाव योगेश आहे. तो मुंबईतल्या वर्सोवा बीचजवळ लिट्टी-चोखा विकतो. ते सुद्धा फक्त 20 रुपयांमध्ये. (यामध्ये तुम्हाला बटरमध्ये बुडालेल्या दोन लिट्टी, स्वादिष्ट चोखा, चटणी आणि सलाड मिळते.) हा तरुण झोमॅटोवर लिट्टी-चोखा विकण्याचा प्रयत्न करत आहे. पण त्याला झोमॅटोबद्दल जास्त माहिती नाही.'

हे वाचा - नवरीच्या पाठवणीनंतर नवऱ्यावर आली रडण्याची वेळ! पहिल्याच रात्री जेलमध्ये रवानगी

प्रियांशूनं आणखी एका ट्विटमध्ये असं म्हटलं आहे की, 'त्याने मला सांगितलं की तो सध्या आर्थिक संकटात असून त्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. लिट्टी-चोखा विकून घराच्या भाड्यासाठी पैसेसुद्धा मिळत नाही. लिट्टी-चोखा विकताना अनेकांना पैसे द्यावे लागतात. तो दुकान बंद करण्याचा विचार करत आहे. त्यामुळे मी झोमॅटोला आवाहन करतो की त्याला आपल्या प्लॅटफॉर्मवर जागा द्या. मी गॅरंटी देतो की एवढी चांगली लिट्टी कुठेच मिळणार नाही.'

प्रियांशूने ही पोस्ट 16 मार्चला केली होती. सध्या सोशल मीडियावर ही पोस्ट खूप व्हायरल होत असून या पोस्टला 2 हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. तर अनेक जण भरभरुन कमेंट्स करत आहेत. तसंच अनेक युझर्सनी योगेशचं दुकान नेमकं कुठं आहे याबाबत विचारणासुद्धा केली आहे. योगेशच्या व्यवसायाला चालना मिळण्यासाठी लवकरच त्याच्या दुकानाला भेट देऊ असं अनेक युझर्सनी सांगितलं आहे.

हे वाचा - तरुणींच्या स्टंटला नेटकऱ्यांकडून मिळाली वाह वाह!पोलिसांच्या कारवाईनं घडवली अद्दल

प्रियांशूनं केलेली पोस्ट झोमॅटोपर्यंत पोहोचली असून झोमॅटोनं देखील ही पोस्ट शेअर करत योगेशला मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. झोमॅटोनं ट्वीट करत असं म्हटलं आहे की, 'जर शक्य असेल तर कृपया त्याचा संपर्क क्रमांक प्रायव्हेट मेसेजवर पाठवा. जेणेकरून आमची टीम त्याच्यापर्यंत लवकर पोहोचू शकेल आणि रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.'

First published: March 18, 2021, 5:34 PM IST
Tags: foodZomato

ताज्या बातम्या