मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

लावणी कलाकार झाली थेट PSI; वाचा, सुरेखा कोरडेंच्या ध्येयवेड्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी

लावणी कलाकार झाली थेट PSI; वाचा, सुरेखा कोरडेंच्या ध्येयवेड्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी

पोलीस अधिकारी सुरेखा कोरडे

पोलीस अधिकारी सुरेखा कोरडे

सुरेखा कोरडे यांना नृत्याची आवड होती. नृत्यामध्येच आपलं करिअर करावे, असे त्यांना वाटायचे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India
  • Published by:  Khushalkant Dusane

पुणे, 4 डिसेंबर : महाराष्ट्रातील लावणी हा प्रकार देशभरातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. लावणीला महाराष्ट्राच्या कला संस्कृतीमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. मात्र, लावणी कलाकार कधी महिला कधी पोलीस अधिकारी झाल्याचे तुम्ही ऐकले नसेल. मात्र, एका तरुणीने हा थक्क करणारा प्रवास पूर्ण करून दाखवलाय. पोलीस अधिकारी सुरेखा कोरडे यांनी हे शक्य करुन दाखवलंय.

लावणी कलाकार ते PSI -

सुरेखा कोरडे यांना नृत्याची आवड होती. नृत्यामध्येच आपलं करिअर करावे, असे त्यांना वाटायचे. मात्र, त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती नाजूक होती. त्यामुळे सातवीत असतानाच आईसोबत धुणीभांडी करायला त्या जाऊ लागल्या. नृत्याची प्रचंड आवड असल्याने दहावीनंतर त्या छोट्या- मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घ्यायच्या. मात्र, परिवारातून त्यांना विरेध होता. मात्र, तरीसुद्धा त्यांनी लावणी कलाकार ते पोलीस अधिकारी यशस्वी प्रवास शक्य करुन दाखवला.

सुरेखा कोरडे यांचं सुरुवातीचं शिक्षण हे औंधमधील कस्तुरबा गांधी वसाहत इथे झालं. त्यांचे वडील पीएमटी ड्रायव्हर होते. तर आई धुणीभांडीचं काम करत. घरात पाच मुली, घरची आर्थिक परिस्थिती तेवढी चांगली नव्हती. परिवाराला आर्थिक हातभार लागेल आणि छंदही जोपासला जाईल, या विचारातुन त्यांनी लावणी करायला सुरुवात केली.

नृत्याच्या करिअरला अशी झाली सुरुवात -

त्या दहावीत होत्या. त्यावेळी त्यांना कराटेच्या स्पर्धेसाठी काठमांडूला जायचं होतं. मात्र, त्याची फी 9 हजार रुपये इतके होती. त्यांच्याकडे फी भरण्यासाठी पैसे नव्हते. याचदरम्यान त्यांना एका नृत्य स्पर्धेची जाहिरात कळाली. त्यांनी त्या स्पर्धेत सहभाग घेत पहिला क्रमांक पटकावला आणि स्पर्धेच्या माध्यमातून 12 हजार रुपये बक्षिसा रक्कम जिंकली. याच रकमेतून त्यांनी काठमांडूच्या कराटे स्पर्धेत भाग घेतला आणि सिल्व्हर मेडल जिंकलं. इथूनच सुरेखा कोरडे यांच्या नृत्याच्या करियरला सुरुवात झाली.

हेही वाचा - गड्याचा नादच खुळा! NDA साठी सोडले IIT वर पाणी; मी नापास झाल्याचं सांगितलं अन्...

या लोककलेकडे आई-वडील आणि समाज हा नेहमीच वाईट नजरेने बघतो. त्यामुळे वडिलांचा सुरुवातीला खूप विरोध होता. त्यानंतर घरूनच विरोध असल्यामुळे समाजातील लोकही खूप काही बोलायचे. मात्र, तरीसुद्धा आवड म्हणून त्यांनी वडिलांना न सांगता लावण्यखणीचे अनेक शो केले. त्यानंतर जर तु पुढचं शिक्षण घेतलं, तर आम्ही तुला लावणी करायला परवानगी देतो, अशी अट एक दिवशी त्यांच्या वडिलांनी त्यांना घातली, यानंतर त्यांनी ती अट मान्य केली आणि लावणीच्या आवडीसाठीच त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले.

पदवीनंतर स्पर्धा परिक्षेची तयारी -

सुरेखा कोरडे यांनी पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. पोटाची खळगी भरण्यासाठी एकीकडे लावण्याचे कार्यक्रम सुरुच होते. सोबतच दिवसभर नृत्य केल्यावर रात्री अभ्यास असा प्रवास सुरू होता. त्यांच्या अभ्यासासाठी लावणीच्या प्रमुखांनी सुरेखासाठी प्रवास करणाऱ्या त्यांच्या गाडीमध्ये अभ्यासाची खास सोय करून दिली होती.

एमपीएससीची पूर्व परीक्षा दिल्यानंतर 2010 मध्ये त्यांनी एमपीएससीच्या मुख्य परीक्षेसाठी त्यांनी दोन महिने सदाशिव पेठमध्ये राहून अभ्यास केला. या परिक्षेत त्या उत्तीर्ण झाल्या आणि त्यांनी अधिकारी पदाला गवसणी घातली. त्यांची पहिली पोस्टिंग कळंबोली पोलीस स्टेशनला झाली. सध्या त्या गुन्हे अन्वेषण शाखेत पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत.

First published:

Tags: Police, Pune, Success story