मुंबई, 24 ऑगस्ट: कोरोनामुळे (Corona) अनेक मोठ्या कंपन्यांना आर्थिक फटका बसला आहे. तर काही कंपन्या मात्र जोमात आहे. IT क्षेत्रातील (IT sector) काही कंपन्यांना कोरोनाकाळातही मोठा फायदा झाला आहे. मात्र काही कंपन्यांचा ऍट्रिशन रेट (Attrition Rate) अधिक आहे. यातीलच एक कंपनी म्हणजे L & T (Larsen & Toubro Infotech). L & T (Larsen & Toubro) कंपनीचा यावर्षीचा ऍट्रिशन रेट म्हणजेच कर्मचारी कंपनी सोडून जाण्याचा रेट सर्वाधिक आहे. त्यामुळे आता कंपनीनं या आर्थिक वर्षात तब्बल 4500 फ्रेशर्सना (Freshers jobs in Larsen & Toubro) नोकरी देण्याची घोषणा केली आहे.
गेल्या वर्षी कंपनीनं नवीन 3000 फ्रेशर्सना नोकरीची संधी दिली होती. मात्र यावर्षी तब्बल 4500 फ्रेशर्सना नोकरी देण्यात येणार आहे अशी घोषणा कंपनीच्या एका मोठ्या अधिकाऱ्यानं केली आहे.
हे वाचा - MHA Recruitment: गृहमंत्रालयात नोकरीची मोठी संधी; 'या' पदांसाठी होणार भरती
कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कंपनी तरुण आणि टॅलेंटेड फ्रेशर्सना नोकरी देणार आहे. गेल्या पाच वर्षांत L & T ची कमाई डॉलरच्या तुलनेत वार्षिक दरानं 13.5 टक्के वाढली आहे तर या कालावधीत नेट इनकम दुप्पट झालं आहे.
क्लाउड आणि इतर महत्त्वाच्या विषयांबाबतच ज्ञान असणाऱ्या उमेदवारांवर कंपनीचं लक्ष असणार आहे. अशा उमेदवारांनाच कंपनी नोकरीची संधी देणार आहे. कारण ही काळाची गरज आहे असं कंपनीच्या अधिकाऱ्यांनी म्हंटलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात L & T सारखी मोठी कंपनी फ्रेशर्सना दिलासा देणार आहे याबाबत शंका नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.