श्रीनगर (जम्मू-काश्मीर), 23 ऑगस्ट: कोंकण रेल्वेत (Konkan Railway Recruitment 2021) CIVIL इंजिनिअर्ससाठी (Civil Engineer jobs) लवकरच पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसंसूचना (KRCL Recruitment) जारी करण्यात आली आहे. या भरतीद्वारे तांत्रिक सहाय्यकाच्या एकूण 14 जागा भरल्या जाणार आहेत. ज्यात वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (CIVIL) साठी 7 पदं आणि कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक (CIVIL) साठी 7 पदं असणार आहेत. पात्र उमेदवारांनी यासाठी थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे.
या पदांसाठी भरती
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (Sr. Technical Assistant Civil)
कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक (Jr. Technical Assistant Civil)
शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (Sr. Technical Assistant Civil) - सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी आणि दोन वर्षांचा अनुभव आवश्यक.
कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक (Jr. Technical Assistant Civil) - सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी आवश्यक.
हे वाचा - Indian Oil Recruitment: इंडियन ऑईलमध्ये तब्बल 480 जागांसाठी होणार मेगाभरती
मिळणार इतका पगार
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (Sr. Technical Assistant Civil) - 35,000 रुपये प्रतिमहिना
कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक (Jr. Technical Assistant Civil) - 30,000 रुपये प्रतिमहिना
मुलाखतीचा पत्ता
USBRL, प्रकल्प मुख्य कार्यालय, कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लि., सत्यम कॉम्प्लेक्स, संगमरवरी बाजार, विस्तार-त्रिकुटा नगर, जम्मू, जम्मू आणि काश्मीर (यूटी). पिन 180011.
मुलाखततीची तारीख
वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक (Sr. Technical Assistant Civil) - 20 ते 22 सप्टेंबर 2021
कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक (Jr. Technical Assistant Civil) - 23 ते 25 सप्टेंबर 2021
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career opportunities, Konkan, Railway jobs