Home /News /career /

विद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये शिकत आहात तर आताच फॉलो करा 'या' करिअर टिप्स; नक्की व्हाल यशस्वी

विद्यार्थ्यांनो, कॉलेजमध्ये शिकत आहात तर आताच फॉलो करा 'या' करिअर टिप्स; नक्की व्हाल यशस्वी

आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुम्ही कॉलेजमध्ये शिकत असतानाच योग्य ते करिअर निवडू शकता.

    मुंबई, 28 जुलै: कॉलेजचं शिक्षण (College Education) सुरु असताना सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे करिअर (Career selection). कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशन झाल्यानंतर नोकरी आणि करिअर (Career and Jobs after Graduation) निवडण्याबाबत विद्यार्थ्यांना संभ्रम असतो. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना योग्य करिअर निवडण्यामध्ये अडचणी येतात. मात्र आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स (Tips for better career) देणार आहोत ज्यामुळे तुम्ही कॉलेजमध्ये शिकत असतानाच योग्य ते करिअर निवडू शकता. चला तर मग जाणून घेऊया. तुम्ही कॉलेजमध्ये जो  कोर्स करत आहात आणि भविष्यात ज्या करियर लाइनकडे जायची इच्छा आहे त्यानुसार इंटर्नशिप (Internships) करा. तुम्हाला ज्या क्षेत्रात करिअर करायचं आहे त्या क्षेत्रातील सर्व लेटेस्ट टेक्नॉलॉजी (Latest Technology), नॉलेज आणि स्किल-सेट्स शिकून घ्या. सेल्फ मोटिव्हेटेड (Motivated) राहा आणि इंटरनेटवर नोकरीच्या वेब पोर्टलवर योग्य संधी शोधत राहा. कॉलेजच्या अभ्यासा दरम्यान आपल्या करिअरच्या क्षेत्रातील कामाचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करा. हे वाचा -  टाटा मोटर्स पुणे इथे 10वी पास उमेदवारांसाठी मोठी पदभरती; आताच इथे करा अप्लाय योग्य ते करिअर निवडण्यासाठी करिअर काउन्सिलरची मदत घ्या. तुमचे शिक्षक, पालक आणि काही अनुभवी व्यक्तींशी सात तुमच्या करिअरबद्दल बोलत राहा आणि त्यांचा सल्ला घेत राहा. कॉलेजच्या अभ्यासा दरम्यानच स्पर्धा परीक्षांची तयारी करण्याची सुरुवात करा. शिक्षण सुरु असतानाच काही महत्त्वाच्या आणि मोठ्या कंपनीमध्ये मुलाखती देण्यास विसरू नका. सतत नवीन आणि तुमच्या क्षेत्रात महत्त्वाच्या गोष्टी शिकत राहा. यासाठी आपला एक रोल मॉडेल नक्की ठरवा.   .
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Student

    पुढील बातम्या