• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • तुम्हालाही घर सजवायला आवडतं का? मग इंटेरियर डिझाईनमध्ये करा करिअर; वाचा माहिती

तुम्हालाही घर सजवायला आवडतं का? मग इंटेरियर डिझाईनमध्ये करा करिअर; वाचा माहिती

इंटेरियर डिझायनिंगमधील काही करिअरच्या (Career in Interior Design) संधींबाबत सांगणार आहोत.

 • Share this:
  मुंबई, 29 जून : आजच्या काळात प्रत्येकाला आपलं घर, कार्यालय अधिकाधिक आकर्षक बनवायचं आहे जे केवळ इंटेरियर डिझायनिंगद्वारे (Interior Design) शक्य आहे. हेच कारण आहे की इंटिरियर डिझायनिंग (Interior Design) वेगानं वाढणारं करिअर बनत आहे. त्यामुळे बरेच विद्यार्थी बारावीनंतर इंटेरियर डिझाईनिंगकडे वळतात. आज आम्ही तुम्हाला  इंटेरियर डिझायनिंगमधील काही करिअरच्या (Career in Interior Design)  संधींबाबत सांगणार आहोत. हे गुण असणं आवश्यक इंटेरियर डिझाइनची चांगली समज, आवड ग्राहकांच्या मागणीनुसार डिझाईन्स बदलण्याची क्षमता ग्राहकांच्या बजेटनुसार इंटेरियर डिझायनिंग नवीन ट्रेंड, मागणी समजून घेणे अधिक चांगले संवाद कौशल्य हे वाचा - Dressing in Interview: मुलाखतीसाठी तयार होताना या गोष्टी ठेवा लक्षात शिक्षणाच्या संधी इंटेरियर डिझाइनमध्ये असोसिएट डिग्री इंटेरियर डिझाइनमध्ये बॅचलर डिग्री इंटेरियर डिझाइनमध्ये मास्टर डिग्री डिप्लोमा इन इंटेरियर डिझाईन डिप्लोमा इन इंटेरियर  स्पेस अँड एथनिक डिझाईन इंटेरियर डिझाइनमधील बीबीए इंटेरियर  डिझाइनमधील एमबीए पीजी डिप्लोमा इन इंटेरियर  डिझाईन इंटेरियर डिझाइनमध्ये अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा करिअरच्या संधी इंटेरियर डिझाइनर त्यांच्या ग्राहकांच्या बजेटनुसार घरं, कार्यालयं आणि इतर सार्वजनिक-खाजगी ठिकाणं सुंदर, आकर्षक बनवू शकतात. चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीजमध्ये चांगल्या इंटेरियर डिझाइनर्सचीही मागणी आहे.
  Published by:Atharva Mahankal
  First published: