मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

खरं की काय? शिक्षणात पदवी न घेताही तुम्ही कमावू शकता लाखो रुपये; 'या' क्षेत्रांमध्ये करा करिअर

खरं की काय? शिक्षणात पदवी न घेताही तुम्ही कमावू शकता लाखो रुपये; 'या' क्षेत्रांमध्ये करा करिअर

इंडिया स्किल रिपोर्ट 2022मधील माहिती जाणून घ्या

इंडिया स्किल रिपोर्ट 2022मधील माहिती जाणून घ्या

तुम्ही लाखो रुपये कमावू शकता. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला पदवीपर्यंत शिक्षण घेण्याचीही गरज पडणार नाही.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 18 नोव्हेंबर: आजकालच्या टेक्नोलॉजी आणि इनोव्हेशनच्या जगात पैसे कमवण्याचा (Skill Based Jobs) आणि शिक्षणाचा कोणताही संबंध उरलेला नाही. शिक्षण महत्त्वाचं आहेच मात्र त्यासोबत तुमच्याकडे स्किल्स (Skills to get a job) असणं महत्त्वाचं आहे. तुमच्याकडे संबंधित क्षेत्रात स्किस्ल असतील तर तुमच्या शिक्षणाकडे (Skills based jobs without education) दुर्लक्ष करून नोकरी देण्यात येते. त्यात काही करिअर (Career without Education) असे आहेत ज्यात शिक्षणापेक्षाही कामाला अधिक महत्त्वं आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच काही क्षेत्रांबद्दल (How to get job without graduation) सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्ही लाखो रुपये कमावू शकता. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला पदवीपर्यंत शिक्षण घेण्याचीही गरज पडणार नाही. चला तरम्ग जाणून घेऊया.

रिअल इस्टेट एजन्ट

जर तुमच्याकडे कोणतेही खास एजुकेशन नाही तर तुम्ही रिअल एस्टेट एजंट (Real Estate Agent) किंवा प्रॉपर्टी डीलर (How to become property dealer) तुम्ही काम करू शकता. या जॉबमध्ये तुम्ही प्रॉपर्टी खरेदी करणाऱ्या आणि विकत घेणाऱ्यांमध्ये मध्यवर्ती भूमिका निभावू शकता.. यात जॉब ऑप्शनची गरज नाही हा एक बिझिनेस आहे. फक्त वास्तविक एस्टेट ब्रोकर म्हणून प्रॅक्टिस करण्यासाठी लाइसेंस घेणं आवश्यक आहे.

फोटोग्राफर म्हणून करा बिझिनेस

आजकाल डिजिटल फोटोग्राफीने (Career in Photography) नवीन उंची गाठली आहे आणि कोणीही सुंदर छायाचित्रे घेऊ शकतो. ज्या लोकांना फोटोग्राफीची आवड आहे, ते आपल्या छंदाला आपला व्यवसाय बनवून चांगले पैसे कमवू शकतात. या व्यवसायासाठी (Business in Photography) विशेष पदवी आवश्यक नाही. तरीही, तुम्हाला हवे असल्यास, तुम्ही फोटोग्राफीशी संबंधित कोर्स करू शकता आणि लाखो रुपये कमावू शकता.

Interview Tips: Job Interview एका झटक्यात Crack करायचाय? मग 'या' टिप्स करा फॉलो

इंटेरिअर कंपन्यांसोबत करू शकता काम

आजकाल भारतात कार्पेंटरना खूप मागणी आहे. पूर्वी लोक आपल्या घरासाठी टेबल आणि खुर्च्या बनवण्यासाठी कारपेंटर्सची (Carpainter course) मदत घेत असत. पण आता बहुतेक लोक इंटिरिअर डिझायनिंग कंपन्यांची मदत घेतात आणि लाकडाचे संपूर्ण काम त्यांच्या घरातच करून घेतात. त्यामुळे भारतातील इंटिरियर डिझायनिंग कंपन्यांमध्ये कारपेंटर्सची मागणी लक्षणीयरीत्या वाढली आहे. ही नोकरी पूर्णपणे कौशल्यावर आधारित आहे आणि यामध्ये तुम्हाला कामानुसार भरघोस पैसे मिळू शकतात.

इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये आहे पैसेच पैसे

आजकाल लग्नापासून कोणताही कार्यक्रम आयोजित करण्यासाठी इव्हेंट मॅनेजरची गरज भासते. जर तुमच्याकडे क्रिएटिव्ह माईंड आहेत आणि नवनवीन आयडिया आहेत तर या व्यवसायात नवीन उंची गाठण्यास तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही.. यासाठी तुम्हाला कोणत्याही पदवीची गरज नाही (Event manager jobs)

First published:

Tags: Career opportunities, जॉब