मुंबई, 07 नोव्हेंबर: मुलाखतीच्या (Interview Tips) वेळी समोरच्यावर तुमचा ठसा उमटवावा लागतो. मुलाखतीचा कालावधी कितीही असला तरी ती नोकरी तुमच्या नावावर (Interview tips for Success) करण्यासाठी तुमच्याकडे तेवढाच वेळ आहे असे गृहीत धरले पाहिजे. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या काही प्रश्नांची यादी अगोदरच ठेवावी. हे प्रश्न तुम्ही मुलखतकाराला (Interview Process) विचारू शकता. Interview पॅनेलमध्ये उपस्थित असलेल्या लोकांना प्रभावित करण्यासाठी, तुम्हाला त्यांना काही प्रश्न (Questions to ask to interviewer while interview) देखील विचारावे लागतील. हे प्रश्न विचारले तर तुम्हाला ऑफिसमध्ये एक वेगळा मान मिळू शकतो. चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत हे प्रश्न.
या कामात चॅलेंजेस काय असतील?
तुम्हाला हे अत्यंत हुशारीने विचारावे लागेल आणि मुलाखतकाराच्या मुद्द्याचा दडलेला अर्थ समजून घ्यावा लागेल. ही माहिती अशी आहे की कंपनी तुम्हाला कधीही लेखी देणार नाही किंवा तुमचा मॅनेजर तुमच्यासमोर असे काही बोलणार नाही. मात्र हे सगळं तुम्हाला खूप हुशारीनं प्रश्न विचारून काढून घ्यावं लागेल.
टीमसोबत कोणत्या प्रकारचं काम करावं लागेल?
हा सामान्य प्रश्न आहे. मुलाखत घेणारा तुमच्या प्रश्नांमध्ये किती रस घेत आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही हे देखील विचारू शकता. हे तुम्हाला नवीन ठिकाणी कसे काम करावे लागेल आणि तुमची टीम कशी आहे याची कल्पना देखील देईल.
तुम्हालाही वनविभागात नोकरी करायची आहे? मग ही महत्त्वाची माहिती नक्की वाचा
सुरुवातीच्या काळात मला काय काम करावं लागेल?
याद्वारे तुम्हाला कळेल की सुरुवातीच्या दिवसात तुम्हाला किती काम करावे लागेल. तुम्ही येथे कोणत्या नवीन गोष्टी शिकू शकाल आणि तुम्हाला मदत करण्यासाठी तेथे कोणी असेल का? जर तुमच्या मनाप्रमाणे नसेल तर तुमची इच्छा पण नक्की सांगा.
इथे काम करण्याचा तुमचा अनुभव काय?
तुमचा हा प्रश्न मुलाखत घेणाऱ्याला आश्चर्यचकित करेल पण तो नक्कीच प्रभावित होईल. त्याने पूर्ण वेळ काढून इथे काम करण्याचा अनुभव सांगितला तर समजा त्याला इथे काम करायला मजा येते. पण जर त्याने दोन-तीन मिनिटांत उत्तर पूर्ण केले तर समजा तुमच्यासाठीही ते कठीण होऊ शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.