Home /News /career /

विद्यार्थ्यांनो, 11वी प्रवेशासाठी CET देताय? मग अशा पद्धतीनं करा Smart Study; यश तुम्हालाच मिळणार

विद्यार्थ्यांनो, 11वी प्रवेशासाठी CET देताय? मग अशा पद्धतीनं करा Smart Study; यश तुम्हालाच मिळणार

या परीक्षेची तयारी कमीतकमी वेळात कशी करायची हे आज तुम्हाला सांगणार आहोत.

मुंबई, 27 जून : महाराष्ट्र राज्य शासनानं (Government of Maharashtra) दहावी आणि बारावीच्या परीक्षा (10th and 12th Exams) कोरोनामुळे (Corona virus) रद्द केल्या. दहावीआणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल आता इंटर्नल मार्क्सवर (Internal Marks) लागणार आहे. मात्र आता दहावीचा निकाल (10th Exams) लागल्यानंतर लगेचच अकरावी प्रवेशासाठी (CET for 11th Admissions) राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडून कॉमन एंट्रन्स टेस्ट (Common Entrance Test) म्हणजे CET घेण्यात येणार आहे. दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित ही परीक्षा असणार आहे. दोन तासांच्या असलेल्या या परीक्षेत प्रत्येकी 25 मार्कांचे चार विषयांचे प्रश्न असणार आहेत. मात्र आता याबाबत विद्यार्थ्यांच्या मनात चिंता निर्माण झाली आहे. मात्र आता घाबरू नका. या परीक्षेची तयारी कमीतकमी वेळात कशी करायची (How to prepare for CET) हे आज तुम्हाला सांगणार आहोत. नोट्स जमा करा तुम्ही संपूर्ण वर्षभरात केलेला अभ्यास या एका परीक्षेत तुम्हाला आठवावा लागणार आहे त्यामुळे सर्व नोट्स जमा करा. विषयांनुसार त्या नोट्समधील काही महत्त्वाचे प्रश्न (Important Questions) आणि त्यांची उत्तरं थोडक्यात लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. हे वाचा -नांदेडच्या शेतकरी कन्येची गगन भरारी;14 व्या वर्षीच अमेरिकेत केलं विमानउड्डाण विषयांचं वर्गीकरण करा या परीक्षेत तुम्हाला चार विषयांचे मिळून प्रश्न विचारण्यात येणार आहेत. त्यामुळे विषयांचं वर्गीकरण करा. प्रत्येक विषयांमधील महत्त्वाच्या टॉपिक्सची यादी तयार करा. या आधीच्या परीक्षेत कोणते प्रश्न विचारण्यात आले होते त्याबद्दल माहिती घ्या. सर्व प्रकारच्या प्रश्नांसाठी तयार राहा CET हे परीक्षा नक्की कोणत्या स्वरूपाची असणार आहे याबाबत अजूनही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे या परीक्षेसाठी अभ्यास करता असताना प्रत्येक प्रश्न आणि त्याचं उत्तर समजून वाचा, यामुळे प्रश्न फिरवून विचारला तरी तुम्हाला त्याचं योग्य ते उत्तर देता येईल. पोपटपंची करू नका. उत्तरं लक्षात ठेवण्याच्या पद्धती वापरा लक्षात ठेवा परीक्षा जरी शंभर मार्कांची असली तरी तुम्हाला अभ्यास पूर्ण करायचा आहे. त्यामुळे उत्तरं लक्षात ठेवण्यासाठी काही सिम्बॉल्स (Symbols), चित्र (Sketches) किंवा काही स्मार्ट पद्धतींचा (Smart study) उपयोग करा. यामुळे तुम्ही प्रश्नांची उत्तरं कधीच विसरणार नाही. आत्मविश्वास महत्त्वाचा लक्षात ठेवा ही परीक्षा तुम्हाला अकरावीत चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा यासाठी आहे. त्यामुळे आत्मविश्वास (Confidence) महत्त्वाचा आहे. स्वतः वर विश्वास ठेऊन परीक्षा द्या. तुम्ही वर्षभरात जे शिकला आहात त्यावर आधारित ही परीक्षा असणार आहे. त्यामुळे घाबरून जाऊन नका. धैर्यानं परीक्षा द्या.
Published by:Atharva Mahankal
First published:

पुढील बातम्या