Home /News /career /

सावधान! तुम्हाला आलेला नोकरीचा Email खोटा तर नाही ना? अशा पद्धतीनं ओळखा Fraud Mails

सावधान! तुम्हाला आलेला नोकरीचा Email खोटा तर नाही ना? अशा पद्धतीनं ओळखा Fraud Mails

आज आम्ही तुम्हाला अशा fraud ई-मेलला कसं ओळखायचं आणि कसं सावध राहायचं हे सांगणार आहोत.

    मुंबई, 12 जुलै: कोरोनामुळे (Corona virus) बाजारात प्रचंड मंदी आली आहे. कंपन्यांवरही (Companies) आर्थिक संकट ओढवलं आहे. त्यामुळे जॉब मिळणं (Latest Jobs) कठीण झालं आहे. त्यातही एखादा जॉब ऑफर (Job Offers) करणारा ई-मेल आपल्याला मिळाला तर पर्वणीच. त्यात हा ई-मेल (Offer Letter) कोणत्या मोठ्या कंपनीकडून असेल तर आपला आनंद गगनात मावत नाही. अशा वेळी आपण भान हरपून काम करतो. मात्र या सगळ्या परिस्थतीचा फायदा काही Online Fraud करणारे घेतात. एखाद्या मोठ्या आणि नावाजलेल्या कंपनीचं लेटर हेड (Fraud Email) वापरून आपल्याला जॉबची ऑफर (Fraud Job Offer) देतात आणि यासाठी काही पैशांची मागणी करतात. अशा Fraud मध्ये अनेकजण फसतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा fraud ई-मेलला (How to Identify Fraud Emails) कसं ओळखायचं आणि कसं सावध राहायचं हे सांगणार आहोत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काही मोठ्या कंपनीच्या अधिकृत वेबसाईट्सवर (Official Websites) अशा fraud मेल करणाऱ्या लोकांबद्दल Warning दिली असते. तसंच इतर लोकांची फसवणूक होऊ नये म्हणून काही सूचनाही दिल्या असतात. मात्र अनेकजण याकडे दुर्लक्ष करतात. कंपनी स्वतःहून संपर्क करत नाही लक्षात ठेवा, कोणतीच मोठी कंपनी तुम्हाला स्वतःहून नोकरीबद्दल विचारणा करत नाही. जर तुम्ही त्या कंपनीमध्ये काम करण्यासाठी अप्लाय केलं असेल तरच तूम्हाला विचारणा होऊ शकते. या व्यतिरिक्त तुम्हाला कोणत्याही कंपनीकडून अप्लाय न करता कॉल आला तर सावध होण्याची आणि शहानिशा करण्याची गरज आहे. हे वाचा -ऑनलाईन जॉब शोधात असाल तर 'या' चुका कधीच करू नका; अन्यथा होईल प्रचंड नुकसान कंपनी पैसे मागत नाही जर तुम्ही कोट्या कंपनीमध्ये नोकरीसाठी अप्लाय केलं असेल तर त्या कंपनीकडून तुम्हाला अनेक कॉल्स आणि ई-मेल येऊ शकतात. मात्र सर्व HIRING Process मध्ये कंपनी तुम्हाला कधीच कोणत्या कारणासाठी पैसे मागत नाही. त्यामुळे तुम्हाला कोणत्या ई-मेल मधून पैशांची मागणी करण्यात आली असेल तर वेळीच सावध व्हा. चुकूनही पैसे देऊ नका. मेसेजद्वारे ऑफर दिली जात नाही जर कोणत्या कंपनीला तुमचा बायोडेटा आवडला असेल तर ती कंपनी तुम्हाला त्यांच्या ऑफिशिअल ई-मेल आयडीवरून सविस्तर मुलाखतीसाठी मेल पाठवते. कंपनीकडून यासाठी कोणत्याही मेसेजिंग अप्लिकेशनचा (applications) उपयोग केला जात नाही. असं आढळल्यास वेळीच वरिष्ठांना सांगणं महत्त्वाचं आहे. बँक डिटेल्स मागत नाहीत लक्षात ठेवा, कोणतीही कंपनी Hiring Process सुरु असताना तुम्हाला तुमच्या बँक डिटेल्स (Bank Details) म्हणजेच अकाउंट नंबर (Account Numbers), पासबुक (Passbook) याबाबत विचारणा करत नाही. तुम्ही कंपनीमध्ये रुजू झाल्यानंतर या सर्व गोष्टी मागण्यात येतात. त्यामुळे त्या आधी कंपनीकडून या गोष्टींची विचारणा झाल्यास सावध होण्याची गरज आहे. हे वाचा - Online Job शोधण्याचा प्रयत्न करताय? अशा पद्धतीनं करा सोशल मीडियाचा वापर स्पेलिंग मिस्टेककडे लक्ष द्या अनेकदा तुम्हाला येणारे Fraud mails हे professional व्यक्तीनं लिहिलेले नसतात. यासाठी फक्त नामांकित कंपनीच्या लेटर हेड आणि लिखाणाच्या शैलीचा वापर करण्यात येतो. त्यामुळे अशा इमेल्स मध्ये प्रचंड लिखाणाच्या चुका असतात तसंच स्पेलिंग मिस्टेकही असतात. त्यामुळे तुम्हालाही असं काही आढळल्यास सर्वात आधी कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Job, Money fraud

    पुढील बातम्या