मराठी बातम्या /बातम्या /करिअर /CRPF च्या सब इन्स्पेक्टरला नक्की किती मिळतो पगार? काय असतात सुविधा? जाणून घ्या

CRPF च्या सब इन्स्पेक्टरला नक्की किती मिळतो पगार? काय असतात सुविधा? जाणून घ्या

सब इन्स्पेक्टरला नक्की किती मिळतो पगार?

सब इन्स्पेक्टरला नक्की किती मिळतो पगार?

केंद्रीय राखीव पोलीस दलातील उपनिरीक्षक पदाचं जॉब प्रोफाइल आणि वेतन याबद्दल माहिती जाणून घेऊ या.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 31 मार्च:  केंद्रीय राखीव पोलीस दल अर्थात ‘सीआरपीएफ’ हे केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारं एक पोलीस दल आहे. सीआरपीएफ केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांपैकी एक आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखणं, ही सीआरपीएफची प्राथमिक जबाबदारी असते. यासोबतच, राज्य/केंद्रशासित प्रदेशांमध्ये नक्षलवाद्यांचा मुकाबला करण्यासाठी पोलिसांच्या कारवाईत सीआरपीएफ सहकार्य करते. निमलष्करी नोकऱ्यांपैकी सर्वांत पसंतीची सरकारी नोकरी म्हणून सीआरपीएफकडे पाहिलं जातं. केंद्रीय राखीव पोलीस दलातील उपनिरीक्षक पदाचं जॉब प्रोफाइल आणि वेतन याबद्दल माहिती जाणून घेऊ या. सीआरपीएफमध्ये उपनिरीक्षक पदावर नियुक्त झालेल्या उमेदवारांना सेवेदरम्यान विविध लाभ आणि भत्ते मिळतात.

पात्रता निकष पूर्ण करणं आवश्यक

सीआरपीएफ उपनिरीक्षक पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना वेतन स्तर सहानुसार रुपये 35,400-1,12,400 या वेतनश्रेणीमध्ये मासिक वेतन दिलं जातं. उमेदवारानं अर्जादरम्यान कोणताही चुकीचा तपशील सादर केल्यास किंवा सीआरपीएफ उपनिरीक्षक पदासाठी आवश्यक असणारे पात्रता निकष पूर्ण न केल्यास, अशा उमेदवाराचा अर्ज बाद करण्यात येतो.

आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्समध्ये तब्बल 1.5 लाख पदं रिक्त; कधी होणार भरती? इथे वाचा अपडेट

वार्षिक पॅकेज किती?

सीआरपीएफमध्ये उपनिरीक्षक पदावर नियुक्त झालेल्या उमेदवाराला साधारणपणे 6 लाख ते 7 लाख रुपयांचं वार्षिक पॅकेज मिळतं. नियुक्त झालेला उमेदवार मासिक वेतन, भत्ते आणि इतर लाभांसाठीदेखील पात्र असतो. त्यांना 35,400-1,12,400 या वेतनश्रेणीनुसार वेतन मिळतं. त्यांची नियुक्ती भारतामध्ये कुठेही केली जाऊ शकते. सीआरपीएफ उपनिरीक्षकाच्या वेतनामध्ये मूळ वेतन आणि भत्ते समाविष्ट असतात. या पदासाठी निवडलेल्या उमेदवारांना त्यांच्या सुरुवातीच्या सेवेदरम्यान नियमांनुसार रुपये 54,000- 60,000 (अंदाजे) मासिक वेतन दिलं जातं.

सरकारी नोकरीची सर्वात मोठी सुवर्णसंधी; पॉवर ग्रिड कॉर्पोरेशनमध्ये 'या' पदांसाठी बंपर ओपनिंग्स

विविध भत्ते व लाभ

उमेदवाराचा परीविक्षा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्याला सीआरपीएफ उपनिरीक्षक पदावर नियुक्त केलं जातं. त्यांना मूळ वेतनासह विविध भत्ते दिले जातात. यामध्ये घरभाडे भत्ता, महागाई भत्ता, प्रवास भत्ता, वर्दी भत्ता, इतर वैद्यकीय लाभ, राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीनुसार निवृत्तिवेतन आणि सीआरपीएफद्वारे वेळोवेळी स्वीकारल्या जाणाऱ्या भत्त्यांचा समावेश आहे.

IAS Tips: UPSC क्रॅक करण्यासाठी नक्की किती वेळ अभ्यास करावा? खुद्द IAS विकास दिव्यकीर्ती यांनी दिल्या टिप्स

पदोन्नतीची असते संधी

परीविक्षा कालावधी पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांची कायमस्वरूपी नियुक्ती केली जाते. यानंतर त्यांना सीआरपीएफ उपनिरीक्षक पदाशी संबंधित सर्व भत्ते मिळतात. पदोन्नती आणि पगारात वाढ या गोष्टी उमेदवाराचं काम, कामाचं स्वरूप, ज्येष्ठता आणि एकूण कामगिरीवर अवलंबून असतात. उच्च पदावर पदोन्नती झाल्यानंतर, त्यांना त्या पदानुसार वार्षिक पॅकेज आणि भत्ते मिळतात.

First published:
top videos

    Tags: Career, Career opportunities, CRPF, Job Alert, Jobs Exams