• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • Rail Kaushal Vikas Yojana: 10वी उत्तीर्ण उमेदवारांना Railway देणार ट्रेनिंग; आज शेवटची तारीख; लगेच करा अप्लाय

Rail Kaushal Vikas Yojana: 10वी उत्तीर्ण उमेदवारांना Railway देणार ट्रेनिंग; आज शेवटची तारीख; लगेच करा अप्लाय

इयत्ता दहावी उत्तीर्ण असणाऱ्या तरुणांना ही संधी देण्यात येणार आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 20 सप्टेंबर: भारत सरकार (Government of India) सध्याच्या काळात देशातील तरुणांमधील कौशल्य वाढवण्याच्या (Skill India) दृष्टीनं काही योजना आणत आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi Birthday) यांच्या वाढदिवसानिमित्त 17 सप्टेंबर रोजी सुरू झालेल्या 'रेल्वे कौशल विकास योजने'अंतर्गत (Railway Skill Development Scheme), रेल्वे पुढील तीन वर्षांत 50,000 तरुणांना ट्रेनिंग (ITI training by Railway) देणार आहे.  इयत्ता दहावी उत्तीर्ण असणाऱ्या तरुणांना ही संधी देण्यात येणार आहे. रेल्वेतर्फे विविध पदांसाठी हे प्रशिक्षण (fitter training by Railway) देण्यात येणार आहे. तरुणांना इलेक्ट्रिशियन (Electrician training), वेल्डर (Welder Jobs), मशिनिस्ट आणि फिटर या चार ट्रेडमध्ये ट्रेनिंग दिलं जाणार आहे. रेल्वे कौशल विकास योजनेअंतर्गत देशभरातील निवडक उमेदवारांना रेल्वेच्या देशभरातील 75 प्रशिक्षण संस्थांमध्ये 100 तासांचं ट्रेनिंग देण्यात येणार आहे. 18 ते 35 वयोगटातील तरुणांना हे ट्रेनिंग दिलं जाईल. या ट्रेनिंग कार्यक्रमाचा अभ्यासक्रम बनारस लोकोमोटिव्ह वर्क्सनं (Banaras Locomotive Works) विकसित केला आहे. हे या योजनेचं नोडल युनिट आहे. ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षणार्थींना रेल्वे/राष्ट्रीय रेल्वे आणि वाहतूक संस्थेद्वारे प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. या वेबसाईटवर करा अर्ज या ट्रेनिंगसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांना http://www.railkvydev.indianrailways.gov.in/rkvy_userHome/ या वेबसाईटवर जाऊन आपले अर्ज द्यायचे आहेत. तसंच या ट्रेनिंगसाठी अर्ज करण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे त्यामुळे उमेदवारांनी लगेचच अर्ज करायचे आहेत. पहिल्या ट्रेनिंग बॅचमध्ये हजार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. हे वाचा - TCS Recruitment: TCS कंपनीत Python डेव्हलपर्स पदासाठी होणार मोठी पदभरती निःशुल्क असणार ट्रेनिंग बनारस लोकोमोटिव्हनं आयोजित केलेलं हे ट्रेनिंग पूर्णतः निःशुल्क असणार आहे. विद्यार्थ्यानं यासाठी शुल्क भरण्याची गरज नसेल. मात्र ट्रेनिंग पूर्ण होतपर्यंत विद्यार्थ्यांनी स्वतःच्या राहण्याची आणि जेवणाची सोय स्वतः करायची आहे असं सांगण्यात आलं आहे. हे ट्रेनिंग तीन आठवड्याचं असणार आहे. या उमेदवारांना संधी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वी उत्तीर्ण असावा. तसेच उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षे दरम्यान असावे. याशिवाय, उमेदवाराला भारताचा कायम नागरिक असणं  देखील आवश्यक आहे. अशाच उमेदवारांना संधी देण्यात येणार आहे. दहावीच्या मार्कांवर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. असं करा अप्लाय सर्वप्रथम रेल्वे कौशल विकास योजनेच्या वेबसाईट www.railkvydev.indianrailways.gov.in वर जा. होम पेज वर Apply Here वर क्लिक करा. आता अर्ज तुमच्या समोर उघडेल. अर्जामध्ये विचारलेली माहिती भरून आपले Complete Your Profile वर क्लिक करा हे वाचा - Infosys Recruitment: देशातील दिग्गज कंपनीत IT प्रोफेशनल्सना नोकरीची मोठी संधी ही कागदपत्रं असणं आवश्यक 10 वी गुणपत्रिका पासपोर्ट फोटो आणि स्वाक्षरीची स्कॅन केलेली कॉपी जातीचं प्रमाणपत्र (आरक्षित प्रवर्गातील असल्यास) फोटो आयडी पुरावा (आधार कार्ड, पॅन कार्ड)
  Published by:Atharva Mahankal
  First published: