Home /News /career /

Exam Tips: जर तुम्हालाही परीक्षेत घ्यायचा असेल पहिला नंबर तर 'या' महत्त्वाच्या टिप्सकडे करू नका दुर्लक्ष; एकदा वाचाच

Exam Tips: जर तुम्हालाही परीक्षेत घ्यायचा असेल पहिला नंबर तर 'या' महत्त्वाच्या टिप्सकडे करू नका दुर्लक्ष; एकदा वाचाच

आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुम्हीही पहिला क्रमांक आणू शकता

    मुंबई, 07 सप्टेंबर: येत्या काळात बऱ्याच परीक्षा विद्यार्थ्यांना द्यायच्या आहेत. NEET UG PG तसंच MH CET, MPSC यासारख्या परीक्षांसाठी विद्यार्थी युद्धपातळीवर अभ्यास करत आहेत. केलेला  अभ्यास नेहमी कमीच असतो असं आपण म्हणत असतो. मात्र जर एका विशिष्ट पद्धतीनं (How to study well) अभ्यास केला तर आपण कधीच दुसऱ्यांच्या मागे राहत नाही. नेहमी वर्गात पहिला नंबर घेणारे विद्यार्थी जादूची कांडी फिरवून मार्क्स घेतात का? हा प्रश्न आपल्याला नेहमीच पडतो. मात्र त्या विद्यार्थ्यांच्या अभ्यास करण्याच्या पद्धतींमध्ये विशेष गोष्ट (How to study like toppers) असते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे तुम्हीही पहिला क्रमांक (How to top the class) आणू शकता आणि चांगला अभ्यास (Study and exam tips) करू शकता. चला तर मग जाणून घेऊया. जुने पेपर्स बघा परीक्षेपूर्वी सुमारे 10 ते 15 वर्षांचे जुने पेपर सोडवणं महत्त्वाचं आहे.  जुने पेपर सोडवल्यानंतर आत्मविश्वास मिळतो आणि आणि परीक्षेत चांगले गन मिळू शकतात.  जुन्या पेपरमधून आपल्याला परीक्षेतील प्रश्नांची पातळी कळते. जुन्या पेपर्समधून आपल्याला हे देखील कळते की परीक्षेसाठी कोणत्या संकल्पना अधिक महत्त्वाच्या आहेत किंवा कोणत्या प्रश्नांवर अनेकदा प्रश्न विचारले जातात. हे वाचा - Breaking: MH CET परीक्षेच्या तारखांची घोषणा; 'या' कालावधीत होणार CET परीक्षा सॅम्पल पेपर सोडवा आजकाल परीक्षांचे स्वरूप दरवर्षी बदलत राहते आणि ताज्या नमुना पेपरच्या मदतीने आगामी परीक्षेचा नमुना कळतो. म्हणूनच जर तुम्हाला आगामी परीक्षेत यशस्वी व्हायचे असेल तर सॅम्पल पेपर सोडवून बघणे महत्त्वाचे आहे. मॉक टेस्ट देत राहा एक गोष्ट लक्षात ठेवा घरी पेपर सोडवणे आणि प्रत्यक्ष परीक्षेत पेपर सोडवणे यात खूप फरक आहे. कॉपी मिळाल्यानंतर अनेक महत्त्वाची माहिती जसं  रोल नंबर  भरावी लागते आणि हे काम करायला वेळही लागतो. परीक्षेच्या वेळी निरीक्षक तुमची चौकशीही करू शकतो आणि तुमचा काही वेळ यात वाया जाऊ शकतो. म्हणूनच आपण सर्व प्रकारच्या परिस्थितीसाठी आधीच तयार राहिलं पाहिजे. यासाठी शक्य तितक्या मॉक टेस्ट सोडवून बघितल्या पाहिजेत.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Exam, Tips

    पुढील बातम्या