मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

गड्यांनो, 'या' क्षेत्रांमध्ये नोकरी मिळाली ना तर सॅलरीचं नो टेन्शन; काही वर्षांमध्ये लाईफ होईल सेट

गड्यांनो, 'या' क्षेत्रांमध्ये नोकरी मिळाली ना तर सॅलरीचं नो टेन्शन; काही वर्षांमध्ये लाईफ होईल सेट

लगेच मिळेल नोकरी

लगेच मिळेल नोकरी

काही क्षेत्रांमध्ये नोकरी करताना तुम्हाला लाखो रुपये पगार मिळतो. हे क्षेत्र नक्की कोणते आहेत याबद्दल आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 01 सप्टेंबर: भारतात नोकऱ्यांची काही कमी नाही. मात्र काही क्षेत्रांमध्ये उच्चशिक्षित आणि अंगात योग्य ते गुण असलेल्या तरुणांची गरज असते. जर तुमच्यात हे गुण असतील तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. अशा परिस्थितीत तुम्हाला पगारही (high salary jobs) उत्तम मिळतो. भारतात (jobs in India) काही क्षेत्रांमध्ये नोकरी करताना तुम्हाला लाखो रुपये पगार मिळतो. हे क्षेत्र नक्की कोणते आहेत याबद्दल आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

मर्चंट नेव्ही

कमाईच्या दृष्टीने मर्चंट नेव्हीची नोकरी चांगली मानली जाते.विज्ञान शाखेतून उत्तीर्ण झालेले उमेदवार या क्षेत्रात जाऊ शकतात. फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथमध्ये ५५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना या क्षेत्रात नोकरी मिळू शकते. मर्चंट नेव्हीमधील कॅप्टन, मरीन इंजिनीअरिंग, नेव्हिगेशन इंजिनीअरिंग या प्रोफाइलसाठी अर्ज करू शकतात. नोकरीच्या सुरुवातीच्या टप्प्यात हा पगार दरमहा 50 ते 60 हजार रुपयांपर्यंत असतो. हा पगार अनुभव आणि श्रेणीनुसार वाढतो, जो दरमहा लाखो रुपयांपर्यंत पोहोचतो.

Ranveer Allahbadia: फिटनेस टिप्स असो वा भन्नाट पॉडकास्ट; हेवा वाटेल असा YouTuber

शास्त्रज्ञ

शास्त्रज्ञाची नोकरी ही उच्च पगाराची नोकरी मानली जाते. या नोकरीची खास गोष्ट म्हणजे तुम्ही अगदी लहानपणापासून नोकरीसाठी प्रयत्न करू शकता. विज्ञान शाखेतून शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना या क्षेत्रात नोकरीच्या भरपूर संधी मिळू शकतात. एखाद्या शास्त्रज्ञाला सुरुवातीच्या टप्प्यात मिळणारा पगार 40 ते 45 हजारांच्या दरम्यान असतो. काही अनुभवानंतर, वार्षिक वेतन पॅकेज 8 ते 15 लाख रुपयांच्या दरम्यान असू शकते.

चार्टर्ड अकाउंटंट

बहुतेक कंपन्यांना व्यावसायिक लेखांकनासाठी चार्टर्ड अकाउंटंटची आवश्यकता असते. हेच कारण आहे की त्यांचा वार्षिक पगार इतर नोकऱ्यांपेक्षा खूपच चांगला आहे. त्यांचा वार्षिक पगार 15 ते 20 लाख रुपये आहे. चार्टर्ड अकाउंटंटचा अभ्यास केल्यानंतरच तुम्ही या क्षेत्रात प्रवेश करू शकता. वाणिज्य क्षेत्रात 55% गुणांसह पदवी किंवा पदव्युत्तर.

Online जॉब शोधताय? जरा थांबा; आधी या टेक्निकल गोष्टी चेक करा; अन्यथा....

डेटा सायंटिस्ट

डेटा सायंटिस्ट ही आयटी क्षेत्रातील नवीन शाखा आहे. भारतात त्याची वाढ झपाट्याने होत आहे. डेटा सायंटिस्ट तांत्रिक क्षेत्राशी संबंधित डेटाच्या परिणामांचा संपूर्ण लेखाजोखा ठेवतो. डेटा सायंटिस्ट प्रशिक्षणार्थीला 3 ते 4 लाख रुपये पगार मिळू लागतो. दोन वर्षांच्या अनुभवानंतर, तो वर्षाला किमान 8.50 लाख रुपये कमावतो. या क्षेत्रात सुमारे चार वर्षांचा अनुभव घेतला, तर वार्षिक पगार 14 ते 16 लाख रुपयांपर्यंत पोहोचतो. या क्षेत्रात जाण्यासाठी आयटी किंवा कॉम्प्युटर सायन्स किंवा स्टॅटिस्टिक्समध्ये बीटेक, बीसीए एमटेक किंवा एमसीए असणे आवश्यक आहे.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job, Jobs Exams