मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Career Tips: Job Interview दिल्यानंतर 'ही' कामं करायला चुकूनही विसरू नका; नोकरी होणार पक्की

Career Tips: Job Interview दिल्यानंतर 'ही' कामं करायला चुकूनही विसरू नका; नोकरी होणार पक्की

चला तर जाणून घेऊया काही मुलाखतीच्या टिप्स.

चला तर जाणून घेऊया काही मुलाखतीच्या टिप्स.

चला तर मग जाणून घेऊया अशा गोष्टी ज्या कोणत्याही Job Interview नंतर करणं महत्त्वाचं आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 29 ऑक्टोबर: Job Interview देण्याच्या आधी किंवा यासाठी तयारी करण्यासाठी आपण प्रचंड मेहनत करतो. अक्षरशः मुलाखतीत विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं (Top interview questions and answers for Job interview) उत्तर अगदी तोंडपाठ करतो. यामुळे मुलाखत उत्तमपणे देण्यात यशस्वी ठरतो. मात्र मुलाखत पूर्ण झाल्यानंतर आपली जबाबदारी संपत नाही. काही गोष्टी अशाही आहेत ज्या मुलाखत दिल्यानंतर करणं (Things to do after job interview) महत्त्वाचं आहे. या गोष्टी केल्यात तर तुम्हाला जॉब (Job Interview Tips) मिळण्यापासून कोणीही थांबवू शकणार नाही. चला तर मग जाणून घेऊया अशा गोष्टी ज्या कोणत्याही Job Interview नंतर करणं महत्त्वाचं आहे.

एखाद्या कंपनीत इंटरव्ह्यू दिल्यानंतरही बराच वेळ तिथून फोन करणे किंवा मेल करणे त्रासदायक ठरते. काही दिवस वाट पाहण्यात निघून जातात आणि मग हळूहळू निराशा डोकावू लागते. मात्र मुलाखतीनंतर पुढील गोष्टी तुम्ही केल्यात तर तुमच्या पदरी निराशा कधीच येणार नाही.

अवाजवी मागण्या करू नका

मुलाखतीनंतरच्या संभाषणात तुमच्या अव्यवहार्य मागण्या तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकतात. मुलाखतीदरम्यान शिफ्टचे तास आणि नोकरीचे ठिकाण जाणून घ्या. नंतर त्यात कोणतीही अडचण येऊ नये. मुलाखतीनंतर उमेदवाराने पगाराच्या संदर्भात त्याच्या/तिच्या अपेक्षेमध्ये बदल केल्यास, नियुक्तीवर चुकीचा परिणाम होतो. तसंच अवाजवी मागण्या केल्यास जॉब हातातून जाऊ शकतो.

घरबसल्या PhonePe सोबत काम करा आणि कमवा हजारो रुपये, वाचा कसे

आभार मानायला विसरू नका

मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीचे आभार मानणारा ईमेल किंवा मुलाखत घेतल्याच्या २४ तासांच्या आत पाठवणे आवश्यक आहे. त्यांनी पुढील काही दिवसांत तुम्हाला पुढील प्रक्रियेबद्दल माहिती दिली नाही, तर दुसरा मेल पाठवून स्वतःची पुष्टी करा. तुम्ही एचआर मॅनेजरला देखील कॉल करू शकता. काही कारणास्तव तुमची निवड न झाल्यास निराश होऊ नका.

रेफरन्स योग्य पद्धतीनं द्या

मुलाखतीनंतर जेव्हा कंपनी तुमचा रेफरन्स विचारेल तेव्हा तुम्हाला कोणतीही अडचण येऊ नये. जर तुम्ही तुमच्या पूर्वीच्या कंपनीशी किंवा तुमच्यासोबत काम करणाऱ्या लोकांशी याविषयी बोलले असेल तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. सहसा कंपनी 3-5 रेफरन्स विचारते. हे सर्व तुम्ही योग्यरीत्या देणं आवश्यक आहे.

First published:

Tags: Career, Tips, जॉब