मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

JEE Advanced 2021: उमेदवारांनो, उद्या होणार परीक्षा; वाचा परीक्षेसाठी जारी केलेल्या गाईडलाईन्स

JEE Advanced 2021: उमेदवारांनो, उद्या होणार परीक्षा; वाचा परीक्षेसाठी जारी केलेल्या गाईडलाईन्स

या परीक्षेसाठीच्या सर्व गाईडलाईन्स भारत सरकारकडून जारी करण्यात आल्या आहेत.

या परीक्षेसाठीच्या सर्व गाईडलाईन्स भारत सरकारकडून जारी करण्यात आल्या आहेत.

या परीक्षेसाठीच्या सर्व गाईडलाईन्स भारत सरकारकडून जारी करण्यात आल्या आहेत.

  • Published by:  Atharva Mahankal

नवी दिल्ली, 02 ऑक्टोबर:  कोरोनामुळे संपूर्ण देशभरात JEE mains ही परीक्षा अनेक टप्प्यांमध्ये घेण्यात आली. त्यानुसार आता JEE Mains परीक्षा उत्तीर्ण केलेल्या उमेदवारांसाठी JEE Advanced 2021 ही परीक्षा घेण्यात येत आहे. ही परीक्षा उद्या संपूर्ण देशभरातील काही परीक्षा केंद्रांवर घेतली जाणार आहे. त्यापूर्वी इंडियन इंस्‍टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खरगपूरनं (IIT Kharagpur) यासंबंधीच्या काही गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षांसाठी जाताना परीक्षा केंद्रांवर  (JEE advance exam center) गेल्यावर किंवा परीक्षा देताना कोणते गाईडलाईन्स पाळावेत यासंबंधीच्या या गाईडलाईन्स (JEE Advanced 2021 Guidelines) असणार आहे. चला तर मग जाणून घेऊया.

सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे परीक्षा केंद्रांवर येतेना विद्यार्थ्यांना किंवा उमेदवारांना स्वतःचं वैध ओळखपत्र (Admit Cards) अनिवार्य असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे  स्वतःचं वैध ओळखपत्र नसेल अशा उमेदवारांना बसण्याची परवानगी देण्यात येणार नाही अशा सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय उमेदवारांना परीक्षा केंद्रांवर कोरोनाच्या सर्व नियमांचं पालन करणं आवश्यक असणार आहे.

हे वाचा - MAHATRANSCO Recruitment: 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी मोठी सुवर्णसंधी

या परीक्षेसाठीच्या सर्व गाईडलाईन्स भारत सरकारकडून जारी करण्यात आल्या आहेत. JEE Advance 2021 या परीक्षेआधी संपूर्ण परीक्षाकेंद्र सॅनेटाईझ करण्याच्या सूचना देणार आल्या आहेत. तसंच परीक्षा केंद्रावर बारकोड स्कॅनर लागले राहणार आहेत. हायजिन ठेवण्यासाठी परीक्षा केमन्द्रनावर असणाऱ्या इन्व्हिझिलेटरच्या हातांमध्ये ग्लोव्स असणार आहेत.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना

उमेदवारांना परीक्षेच्या कमीतकमी तीस मिनिटांआधी परीक्षा केंद्रांवर पोहोचणं अनिवार्य असणार आहे.

स्वतःजवळ कोव्हीड डिक्लेरेशन फॉर्म असणं आवश्यक आहे.

तसंच परीक्षा केंद्रांवर सोशल डिस्टंसिंग ठेवणं आवश्यक असणार आहे.

परीक्षा केंद्रांच्या आतमध्ये उमेदवार मास्क, पाण्याची बाटली इत्यादी वस्तू घेऊन जाऊ शकणार आहेत.

तसंच परीक्षा केंद्रांवर शरीराचं तापमान मोजणारी मशीन असणार आहे.

First published:

Tags: Exam