मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

12वीनंतर ग्रॅज्युएशनसाठी देशातील 'या' टॉप कोर्सेसमध्ये घ्या प्रवेश; नोकरी, पगार आणि करिअर होईल ओक्के

12वीनंतर ग्रॅज्युएशनसाठी देशातील 'या' टॉप कोर्सेसमध्ये घ्या प्रवेश; नोकरी, पगार आणि करिअर होईल ओक्के

देशातील टॉप कोर्सेस

देशातील टॉप कोर्सेस

आज आम्ही तुम्हाला अशाच काही देशातील अशाच काही टॉप कोर्सेस बद्दल सांगणार आहोत. जे कोर्सेस केल्यानंतर तुमचं करिअर सेट होऊ शकतं.

  मुंबई, 17 ऑगस्ट: आजकाल बऱ्याच कंपन्यांमध्ये फ्रेशर्ससाठी मोठ्या प्रमाणावर जॉबच्या संधी उपलब्ध होऊ लागल्या आहेत. अनेक फ्रेशर्सना IT कंपन्या जॉब्स (IT Jobs) देणार आहेत. मात्र यासाठी फ्रेशर्सकडे आवश्यक ते स्किल्स असणं आवश्यक आहे. मात्र हे स्किल्स तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला जॉब मिळू शकणार नाही. तसंच फ्रेशर्स म्हणून तुमच्याकडे काही सर्टिफिकेशन्स (Important IT Certifications) असणंही आवश्यक आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशाच काही देशातील अशाच काही टॉप कोर्सेस बद्दल सांगणार आहोत. जे कोर्सेस केल्यानंतर तुमचं करिअर सेट होऊ शकतं. चला तर मग जाणून घेऊया. फॅशन डिझायनिंग फॅशनची आवड असणारे विद्यार्थी फॅशनच्या जगात करिअर करू शकतात. फॅशन इंडस्ट्रीत जाण्यासाठी बॅचलर ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीची निवड केली जाऊ शकते. हा अभ्यासक्रम बारावीनंतर करता येतो. मेडिकल विज्ञान शाखेत करिअर करण्याचे स्वप्न पाहणारे विद्यार्थी एमबीबीएस, बीडीएस, फूड टेक, नर्सिंग आणि एमआर क्षेत्रात जाऊ शकतात. एमबीबीएससाठी विद्यार्थ्यांना NEET परीक्षेला बसावे लागते. Medical घ्यायचंय? मग NIRF रँकिंगनुसार 'ही' आहेत देशातील टॉप 25 कॉलेजेस; बघा List
  बिझिनेस मॅनेजमेंट
  आजकाल व्यवसाय व्यवस्थापन अभ्यासक्रमांना खूप मागणी आहे. बिझनेस मॅनेजमेंट कोर्स कोणत्याही प्रवाहातील विद्यार्थी करू शकतात. हा अभ्यासक्रम बारावीनंतर करता येतो. विद्यार्थ्यांसाठी बीबीए आणि एमबीए अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. कॉम्प्युटर अप्लिकेशन डिजिटल हॉट लाइफमुळे संगणक अनुप्रयोग अभ्यासक्रमांची मागणी वाढली आहे. ज्या विद्यार्थ्यांना संगणकाची आवड आहे ते बीबीए पदवी अभ्यासक्रमाची निवड करू शकतात. हा अभ्यासक्रम बारावीनंतर करता येतो. कायद्याचं शिक्षण कायद्यात करिअर करणं हा खूप वेगळा अनुभव असतो. ज्यांना केस, क्रिमिनल आणि गुन्ह्यात रस आहे तेच विद्यार्थी कायद्यात जाण्याचा विचार करतात. बारावीनंतर विद्यार्थी एलएलबीला जाऊ शकतात. इंजिनिअरिंग अभियंता क्षेत्रात येण्यासाठी विज्ञानाची पार्श्वभूमी असणे आवश्यक आहे. बारावीनंतर विद्यार्थी बीई करू शकतात. बीई करण्यासाठी, विद्यार्थ्याला प्रवेश परीक्षा द्यावी लागते, ज्या अंतर्गत महाविद्यालयात प्रवेश दिला जातो. हॉटेल मॅनेजमेंट फ्रंट ऑफिस, टुरिझम, बॅक ऑफिस, शेफ आणि मॅनेजमेंटमध्ये करिअर करण्यासाठी हॉटेल मॅनेजमेंटची निवड करता येते. या क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी आहेत. या क्षेत्रात जाण्यासाठी पदवी आणि पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. सावधान! ऑफिसमधील सहकाऱ्यांना तुमच्या 'या' गोष्टी कधीही सांगू नका; अन्यथा.... फूड टेक फूड टेक हा तरुणांसाठी करिअरचा उत्तम पर्याय ठरू शकतो. फूड टेक करण्‍यासाठी विद्यार्थ्‍यांनी विज्ञान प्रवाहात असणे आवश्‍यक आहे. बीएस्सी इन फूड टेक आणि त्यानंतर एमएससी इन फूड टेक करता येते.
  First published:

  Tags: Career, Career opportunities

  पुढील बातम्या