मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

NEET परीक्षेत अपयश आलं? मग चिंता करू नका; NEET न देताही करू शकता 'हे' मेडिकल कोर्सेस

NEET परीक्षेत अपयश आलं? मग चिंता करू नका; NEET न देताही करू शकता 'हे' मेडिकल कोर्सेस

मेडिकल क्षेत्रात करिअर

मेडिकल क्षेत्रात करिअर

आज आम्ही तुम्हाला असे काही मेडिकल कोर्सेस सांगणार आहोत जे तुम्ही NEET परीक्षा ना देताही करू शकता. चला तर मग जाणून घेऊया.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 13 सप्टेंबर: राष्ट्रीय परीक्षा संस्थेने बुधवारी NEET परीक्षेचा निकाल जाहीर केला. एमबीबीएस, बीडीएस सारख्या वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी दरवर्षी NEET परीक्षा घेतली जाते. NEET परीक्षा 17 जुलै रोजी घेण्यात आली होती ज्यासाठी 18 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती आणि जाहीर झालेल्या निकालांनुसार, केवळ 10 लाख विद्यार्थी परीक्षेत पात्र ठरले आहेत. जे विद्यार्थी या राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षेत यशस्वी होऊ शकले नाहीत त्यांनी निराश होण्याची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला असे काही मेडिकल कोर्सेस सांगणार आहोत जे तुम्ही NEET परीक्षा ना देताही करू शकता. चला तर मग जाणून घेऊया.

ग्रॅज्युएशन झालंय ना? मग वाट कसली बघताय; मुंबई विद्यापीठात 38,000 सॅलरीची नोकरी

B.Sc नर्सिंग- हा अभ्यासक्रम चार वर्षांच्या कालावधीत पूर्ण करता येतो. कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला 3 ते 8 लाखांचे पॅकेज मिळू शकते.

B. फार्मा- या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना चार वर्षे अभ्यास करावा लागेल. 2-5 लाखांपर्यंतचे वार्षिक पॅकेज मिळू शकते.

B.Sc बायोटेक्नॉलॉजी- B.Sc बायोटेक्नॉलॉजी हा तीन वर्षांचा अंडरग्रेजुएट कोर्स आहे, हा कोर्स पूर्ण करून, उमेदवार दरवर्षी 3 ते 4 लाखांपर्यंत कमवू शकतात.

मायक्रोबायोलॉजीमध्ये B.Sc- हा देखील तीन वर्षांचा पदवीपूर्व कार्यक्रम आहे, तो पूर्ण केल्यानंतर, तुम्हाला वार्षिक 3-4 लाखांपर्यंत मिळू शकते.

B.Sc in Cardiovascular Technology- हा तीन वर्षांचा कोर्स केल्यानंतर आयुष्याला चांगले करिअरचे पर्याय मिळतात आणि पगारही चांगला मिळतो.

B.Sc in Nutrition- हा तीन वर्षांचा अंडरग्रॅज्युएट कोर्स केल्यानंतर वर्षाला तीन लाखांपर्यंतचे पॅकेज मिळू शकते.

बीएससी इन जेनेटिक्स- जेनेटिक्समध्ये तीन वर्षांचा कोर्स केल्यानंतर, तुम्हाला वार्षिक 5 लाखांपर्यंतचे पॅकेज मिळू शकते.

बायोमेडिकलमध्ये B.Sc- बायोमेडिकलचा हा 4 वर्षांचा कोर्स केल्यानंतर, व्यक्तीला वार्षिक 4 लाखांपर्यंत पगार मिळू शकतो.

सायबर फॉरेन्सिकमध्ये B.Sc- हा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी तीन वर्षे लागतात आणि अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर वेतन 5 ते 7 लाखांपर्यंत असू शकते.

बॅचलर इन फिजिओथेरपी- हा चार वर्षांचा कोर्स आहे, जो पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना 5 लाखांपर्यंत वार्षिक पगार मिळू शकतो.

First published:

Tags: Career, Career opportunities, Medical exams