मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

करिअरचं क्षेत्र कुठलंही असो 'हे' टॉप स्किल्स तुमच्या Resume मध्ये असणं आवश्यक; जॉब तुमचाच

करिअरचं क्षेत्र कुठलंही असो 'हे' टॉप स्किल्स तुमच्या Resume मध्ये असणं आवश्यक; जॉब तुमचाच

Resume बनवण्याच्या काही टिप्स

Resume बनवण्याच्या काही टिप्स

आज आम्ही तुम्हाला असे काही स्किल्स (some important Interview Skills which include in resume) सांगणार आहोत जे तुमच्या Resume मध्ये असणं महत्त्वाचं आहे

  मुंबई, 18 ऑगस्ट: करिअरमध्ये सातत्यपूर्ण प्रगती साधण्यासाठी काळाबरोबर पुढे जात राहणं आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या प्रोफेशनमध्ये किंवा तुमच्या आजूबाजूला असे अनेक लोक पाहिले असतील, जे खूप मेहनती असूनही त्यांच्या करिअरमध्ये प्रगती करू शकत नाहीत. एवढंच नाही तर नोकरीची मुलाखत क्रॅक (How to crack Interview) करणं देखील त्यांच्यासाठी खूप कठीण आहे. मात्र आता चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला असे काही स्किल्स (some important Interview Skills which include in resume) सांगणार आहोत जे तुमच्या Resume मध्ये असणं महत्त्वाचं आहे. चला तर मग जाणून घेऊया. कम्युनिकेशन स्किल्स कम्युनिकेशन स्किल्स म्हणजे आपल्या कल्पना आणि माहिती इतरांसमोर व्यक्त करण्याची क्षमता. यात तुमचे ऐकण्याचे कौशल्य आणि तुम्ही इतरांना किती चांगले समजू शकता याचाही समावेश होतो. आपण आपल्या दैनंदिन जीवनात संवादाच्या विविध पद्धती वापरतो त्या आपण किती प्रभावीपणे वापरतो हे महत्त्वाचं असतं. म्हणूनच कम्युनिकेशन स्किल्स महत्त्वाचे आहेत. 10वी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, BSF विविध पदांसाठी बंपर भरती
  टीमवर्क
  चांगली टीमवर्क कौशल्ये असण्याचा अर्थ असा होतो की तुम्हाला टीममध्ये इतरांसोबत काम करण्यास सोयीस्कर आहे एक सामान्य ध्येय साध्य करण्यासाठी टीमवर्क कौशल्ये तुम्हाला काम करण्यास आणि इतरांशी सहयोग करण्यास सक्षम करतात म्हणूनच तुमच्या CV मध्ये टीमवर्क हे स्किल्स असणं आवश्यक आहे. लीडरशिप स्किल्स लीडरशिप म्हणजे इतरांना प्रभावित करण्याची, प्रेरित करण्याची आणि निश्चित ध्येयाकडे नेण्याची क्षमता. लीडर्स टीम लीड करतात, पुढाकार घेतात आणि अधिकार सोपवतात. एक लीडर म्हणून, तुम्हाला संवाद, पर्यवेक्षण, निर्णय घेणे, समस्या सोडवणे आणि वेळेचे व्यवस्थापन चांगले असणे आवश्यक आहे. हे जर तुमच्याकडे असेल तर हे स्किल तुम्हाला तुमच्या CV मध्ये लिहिणं आवश्यक आहे. इंटरपर्सनल स्किल्स इंटरपर्सनल स्किल्स कौशल्ये ही सामाजिक कौशल्ये आहेत जी आपण आपल्या दैनंदिन जीवनात लोकांशी संवाद साधताना वापरतो. ते तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी चांगले संबंध निर्माण करण्यात आणि टिकवून ठेवण्यास मदत करतात. करिअरमध्ये सतत पुढे जायचंय तर 'या' रिसर्च फेलोशिप कराच; Stipend ही मिळेल उत्तम
  कम्प्युटर स्किल्स
  Resume च्या शेवटी कधीच कम्प्युटर स्किल्स लिहायला विसरू नका. आजकालच्या डिजिटल जमान्यात तुम्हाला कम्प्युटर येणं आवश्यक आहे. म्हणूनच तुमच्याकडे जे कम्प्युटर स्किल्स असतील ते लिहायला विसरू नका
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career, Career opportunities

  पुढील बातम्या