Home /News /career /

MHT CET Time Table: एक क्लिकवर मिळेल CET परीक्षेचा संपूर्ण टाइम टेबल; इथे बघा

MHT CET Time Table: एक क्लिकवर मिळेल CET परीक्षेचा संपूर्ण टाइम टेबल; इथे बघा

त्यानुसार आता MHT CET परिक्षेचा टाईम टेबल (MHT CET Exam Time Table) जाहीर करण्यात आला आहे.

    मुंबई, 08 सप्टेंबर: महाराष्ट्रात 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर या कालावधीमध्ये CET परीक्षा (MHT CET Exam) होणार आहे अशी माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. तसंच ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. पदवी (Degree), पदव्युत्तर (PG) आणि प्रोफेशनल कार्यक्रमासाठी प्रवेश मिळवण्यासाठी ही CET परीक्षा घेण्यात येते. त्यानुसार आता MHT CET परिक्षेचा टाईम टेबल (MHT CET Exam Time Table) जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्र CET परीक्षा 15 सप्टेंबर 2021 ते 10 ऑक्टोबर 2021 दरम्यान घेण्यात येईल. mahacet.org ला भेट देऊन विद्यार्थी पूर्ण वेळापत्रक तपासू शकणार आहेत. हे वाचा - Exam Tips: विद्यार्थ्यांनो, स्पर्धा परीक्षांची तयारी करताय? मग 'ही' पुस्तकं नक्की येतील कामी; एकदा बघाच विविध B. Tech आणि B. Pharm अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एमएचटी सीईटी 2021 परीक्षा 20 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान घेण्यात येईल. मास्टर इन बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन आणि मास्टर इन मॅनेजमेंट स्टडीज (MAH MBA/MMS CET 2021) च्या प्रवेशासाठी परीक्षा 16 ते 18 सप्टेंबर 2021 पर्यंत आयोजित केली जाईल. त्याचबरोबर, मास्टर इन कॉम्प्युटर अप्लिकेशन (MAH-MCA-CET 2020) च्या प्रवेशासाठी परीक्षा 15 सप्टेंबर 2021 रोजी होणार आहे. मास्टर ऑफ आर्किटेक्चर (MAH-M.Arch-CET 2021) आणि बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी (MAH-B.HMCT 2020) च्या प्रवेशासाठीची परीक्षा 15 सप्टेंबर 2021 रोजी संयुक्तपणे घेतली जाईल. या व्यतिरिक्त, मास्टर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट आणि केटरिंग टेक्नॉलॉजी (MAH-M.HMCT 2020) ची परीक्षा 15 सप्टेंबर 2021 रोजी होणार आहे.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Entrance exam

    पुढील बातम्या