मराठी बातम्या /बातम्या /करिअर /तुमचंही शिक्षण Computer Science मध्ये झालंय? मग 'हे' टॉप 10 जॉब्स तुम्हाला देऊ शकतात भरघोस पगार; वाचा सविस्तर

तुमचंही शिक्षण Computer Science मध्ये झालंय? मग 'हे' टॉप 10 जॉब्स तुम्हाला देऊ शकतात भरघोस पगार; वाचा सविस्तर

Cognizant करणार कर्मचाऱ्यांची भरती

Cognizant करणार कर्मचाऱ्यांची भरती

तुमच्यासाठी या क्षेत्रातील प्रोफेशनल्ससाठी काही पदं आणि त्या पदांसाठी मिळणाऱ्या पगाराबद्दल माहिती देणार आहोत.

मुंबई, 28 ऑक्टोबर: IT क्षेत्रात जॉब करणं ही आजकाल कित्येक विद्यार्थ्यांचं स्वप्न बनलं आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे या क्षेत्रात मिळणारा पगार. इतर कोणत्याही क्षेत्रापेक्षा जास्त पगार IT क्षेत्रात (IT jobs salary) काम करणाऱ्या प्रोफेशनल्सना असतो. म्हणूनच आजकल्चग्य काळात कोणत्याही क्षेत्रात पदवीधर (IT sector jobs for Other field graduates) असलेले उमेदवार हे पुढे पदवीनंतर IT क्षेत्रातील एखादा कोर्स (IT courses for Jobs) पूर्ण करून तिथेच जॉब करतात. त्यात जर तुम्ही Computer Science मध्येच पदवीधर (IT sector jobs for IT field) असाल तर पर्वणीच. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला Computer Science क्षेत्रातील टॉप 10 जॉब्सबद्दल (Top 10 jobs and salary in IT sector) सांगणार आहोत आणि त्या जॉब्ससाष्टी मिळणाऱ्या पगाराची माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. यासंबंधीची बातमी टेक-गिग.कॉम नं प्रकाशित केली आहे.

जर तुम्हीही Computer Science क्षेत्रामध्ये नोकरी करू इच्छित असाल तर आम्ही तुमच्यासाठी या क्षेत्रातील प्रोफेशनल्ससाठी काही पदं आणि त्या पदांसाठी मिळणाऱ्या पगाराबद्दल माहिती देणार आहोत.

1) मोबाईल अप्लिकेशन डेव्हलपर (Mobile application developer)

सरासरी पगार - 3,35,328 प्रतिवर्ष

2) IT प्रोजेक्ट मॅनेजर (IT project manager)

सरासरी पगार - 4,15,304 प्रतिवर्ष

3) इन्फॉर्मेशन सिस्टम मॅनेजर (Information systems manager)

सरासरी पगार - 4,70,460 प्रतिवर्ष

4) सिस्टम इंजिनिअर (System engineer)

सरासरी पगार - 5,56,297 प्रतिवर्ष

5) नेटवर्क सिक्युरिटी इंजिनिअर (Network security engineer)

सरासरी पगार - 5,83,693 प्रतिवर्ष

तरुणांसाठी खूशखबर! नोकरीच्या संधींमध्ये 14 टक्क्यांनी वाढ

6) इन्फॉर्मेशन सिक्युरिटी अनॅलिस्ट (Information security analyst)

सरासरी पगार - 5,88,382 प्रतिवर्ष

7) फ्रंट एंड डेव्हलपर ( Front-end developer)

सरासरी पगार - 6,07,759 प्रतिवर्ष

8) सॉफ्टवेअर इंजिनिअर (Software engineer)

सरासरी पगार - 6,45,186 प्रतिवर्ष

9) जावा डेव्हलपर (Java developer)

सरासरी पगार - 6,49,785 प्रतिवर्ष

10) डेटा सायंटिस्ट (Data scientist)

सरासरी पगार - 8,31,930 प्रतिवर्ष

First published:

Tags: Career opportunities, जॉब