मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

बिकट आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेण्यासाठी पैसे नाहीत? Education Loan येईल कामी; ही डॉक्युमेंट्स असणं IMP

बिकट आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण घेण्यासाठी पैसे नाहीत? Education Loan येईल कामी; ही डॉक्युमेंट्स असणं IMP

 ही डॉक्युमेंट्स असणं आवश्यक

ही डॉक्युमेंट्स असणं आवश्यक

आज आम्ही तुम्हाला अशा काही कागपत्रांची यादी (List of Documents for Education Loan) सांगणार आहोत जे Education Loan घेण्याच्या वेळी तुम्हाला गरजेचे आहेत.

    मुंबई, 16 ऑगस्ट: देशात शिक्षण (Education) असो की परदेशात कॉलेजची फी भरण्यासाठी पुरेसे पैसे नसतील तर विद्यार्थी आणि पालकांसमोर एकमेव पर्याय असतो तो म्हणजे Education Loan. आर्थिकदृष्टया सक्षम नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी Education Loan म्हणजे वरदानच आहे. मात्र अनेकदा कोणत्या बँकेत Education Loan साठी गेल्यानंतर आपल्याला लहान लहान कागदपत्रांसाठी परत पाठवण्यात येतं. अशावेळी निराशा होते. जर ते कागदपत्र आपल्याकडे असतील तर ते तयार करण्यापासून सर्व काम आपल्याला करावं लागतं. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा काही कागपत्रांची यादी (List of Documents for Education Loan) सांगणार आहोत जे Education Loan घेण्याच्या वेळी तुम्हाला गरजेचे आहेत. चला तर मग जाणून घेऊया. कोणाला मिळू शकतं Education Loan? Education Loan लोन मिळवण्यासाठी काही निकषांवर पात्र ठरणं आवश्यक आहे. कोणत्याही भारतीय बँकेतून Education Loan घेण्यासाठी आपण प्रथम भारतीय नागरिक (Indian) असणं महत्त्वाचं आहे. तुमचं वय 16 ते 35 वर्ष यामध्ये असणं महत्त्वाचं आहे. तुम्ही करू इच्छिणाऱ्या कोर्समध्ये तुम्हाला एंट्रन्स टेस्टच्या माध्यमातून प्रवेश मिळाला असणं महत्त्वाचं आहे. Medical क्षेत्रात शिक्षण घ्यायचंय? मग NIRF रँकिंगनुसार 'ही' आहेत देशातील टॉप 25 कॉलेजेस; बघा लिस्ट किती मिळू शकतं Education Loan? भारतात उच्च शिक्षणासाठी जास्तीत जास्त 10-15 लक्ष इतकं लोन मिळू शकतं. तर परदेशात उच्च शिक्षणासाठी जाण्यासाठी 20 लाखांपर्यंत लोन मिळू शकतं. ही कागदपत्रं असणं महत्त्वाचं आपण ज्या कोर्स आणि महाविद्यालयात प्रवेश घेणार आहात, त्या कोर्सचं प्रवेश पत्र आणि महाविद्यालयाची संपूर्ण माहिती. कोर्स शुल्काबाबत सविस्तर माहिती असणारे कागद. मार्कशीटची प्रत आणि त्याचशी संबंधित काही महत्त्वपूर्ण कागदपत्रं. वय आणि ओळखपत्र जर तुमच्याकडे त्या बँकेत अकाउंट नसेल तर तुम्हाला त्याबरोबर Address Proof द्यावं लागेल. पालकांच्या उत्पन्नाचा पुरावा. नोकरीवर असल्यास मागच्या दोन महिन्यांचं सॅलरी स्लिप. व्यवसाय असल्यास मागील सहा महिन्यांचं बँक स्टेटमेंट. दोन पासपोर्ट फोटो. परदेशात अभ्यासासाठी जात असल्यास पासपोर्ट आणि व्हिसाची 1-1कॉपी.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, Career opportunities, Education, Loan

    पुढील बातम्या