मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

IAS Officer होण्याचं स्वप्नं बघताय? ही शैक्षणिक पात्रता आवश्यक; किती मिळतो पगार? वाचा

IAS Officer होण्याचं स्वप्नं बघताय? ही शैक्षणिक पात्रता आवश्यक; किती मिळतो पगार? वाचा

जर तुम्हालाही IAS व्हायचं असेल तर ही बातमी तुमच्या कामी येणार आहे.

जर तुम्हालाही IAS व्हायचं असेल तर ही बातमी तुमच्या कामी येणार आहे.

जर तुम्हालाही IAS व्हायचं असेल तर ही बातमी तुमच्या कामी येणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 15 ऑगस्ट: 'मोठं होऊन काय होणार?' हा प्रश्न बहुतांश लहान मुलांना विचारला जातो. या प्रश्नाचं उत्तर देताना अनेक लहान मुलं डॉक्टर (Doctor), इंजिनिअर (Engineer) अशी उत्तरं देतात मात्र काही मुलं मला IAS व्हायचंय (IAS Preparation) असं उत्तर देतात. खरं म्हणजे IAS होणं सोपं आहे असं आपल्याला लहानपणी जरी वाटत असलं तरी ते अजिबात सोपं नाही हे आता लक्षात येतं. मात्र अश्यकही नाही. आपल्यात जर खरंच जिद्द असेल आपण IAS (How to Become IAS)  होऊ शकतो. जर तुम्हालाही IAS व्हायचं असेल तर ही बातमी तुमच्या कामी येणार आहे. आज आम्ही तुम्हाला IAS (Indian Administrative Services) होण्यासाठी काय शैक्षणिक पात्रता (Education for IAS) असावी लागते? आणि IAS ना किती पगार (IAS Salary) मिळतो याबाबत माहिती देणार आहोत.

ही देशातील सर्वात मोठी सरकारी नोकरी आहे. IAS अधिकारी एक प्रभावी व्यक्ती असतो. हा अधिकारी सर्व विभागांना मार्गदर्शन करतो की कोणत्या विभागात कसं काम करावं. केंद्र सरकारचे सर्व सचिव आयएएस अधिकारी आहेत. केवळ एक IAS अधिकारी सर्व विभागांमध्ये सरकारी धोरणे लागू करतो. राष्ट्रपती आयएएस अधिकाऱ्याची नेमणूक करतात. म्हणूनच या अधिकाऱ्यांना राजपत्रित अधिकारी असेही म्हटलं जातं. राज्य सरकार IAS अधिकाऱ्याला निलंबित करू शकते पण त्यांना बडतर्फ करण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपतींना असतो.

हे वाचा - बारावीनंतर टॉप कॉलेजेसमध्ये प्रवेश मिळवायचाय? मग या स्कॉलरशिप परीक्षा नक्की द्या

ही पात्रता असणं आवश्यक

IAS अधिकारी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी कोणत्याही शाखेतून पदवीधर असणं फार महत्वाचं आहे. सामान्य श्रेणीतील विद्यार्थी IAS परीक्षेसाठी 21 ते 32 वर्षांपर्यंत कोणत्याही वेळी 6 वेळा परीक्षा देऊ शकतात. ओबीसी विद्यार्थी ही परीक्षा 21 ते 35 वर्षांपर्यंत 9 वेळा देऊ शकतात. त्याच वेळी, SC आणि ST श्रेणीचे विद्यार्थी IAS परीक्षेसाठी वयाच्या 21 ते 37 वर्षांच्या वयात हव्या तेवढ्या वेळा परीक्षा देऊ शकतात. ही परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांकडे  भारत, नेपाळ किंवा भूतानचं नागरिक असणे अत्यंत महत्वाचं आहे. IAS होण्यासाठी विद्यार्थ्यांना 3 परीक्षा द्याव्या लागतात. यातील पहिला प्रारंभिक परीक्षा, दुसरा मुख्य परीक्षा आणि तिसरा विभाग मुलाखत असतो.

इतका मिळेल पगार

IAS अधिकाऱ्याचं वेतन वेगवेगळ्या निकषांच्या आधारे ठरवलं जातं. तरीही 60 हजार रुपयांपासून ते 2.5 लाख रुपयांपर्यंत इतकं वेतन IAS अधिकाऱ्यांना मिळतं. याशिवाय या अधिकाऱ्यांना अनेक भत्ते स्वतंत्रपणे दिले जातात.

First published:

Tags: Career opportunities, Education, Ias officer, Salary