Home /News /career /

1st Year Admissions: मुंबई विद्यापीठाची पहिली मेरिट लिस्ट जाहीर; कधी येईल दुसरी लिस्ट? वाचा

1st Year Admissions: मुंबई विद्यापीठाची पहिली मेरिट लिस्ट जाहीर; कधी येईल दुसरी लिस्ट? वाचा

दुसरी आणि तिसरी गुणवत्ता यादी ही वेळापत्रकानुसार प्रसिद्ध केली जाईल.

    मुंबई, 18 ऑगस्ट: मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai university) पदवी अभ्यासक्रमांच्या (UG courses in Mumbai) प्रथम वर्षाच्या प्रवेशांची (First Year Admissions) पहिली गुणवत्ता यादी (1st year Merit List) जाहीर करण्यात आली आहे. ही यादी विद्यापीठाच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आली आहे. यासाठीची कागदपत्रं पडताळणी आणि शुल्क भरण्याची प्रक्रिया ही 18 ते 25 ऑगस्टपर्यंत राहणार आहे. दुसरी आणि तिसरी गुणवत्ता यादी ही वेळापत्रकानुसार प्रसिद्ध केली जाईल. तत्पूर्वी 05 ऑगस्ट 2021 पासून प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणी mum.digitaluniversity.ac या संकेतस्थळावर सुरू करण्यात आली होती. नोंदणी झाल्यानंतर यासंबंधीची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. गुणवत्ता यादीतील नावं ही प्रत्येक महाविद्यालयाच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली जातील.  त्यांनतर ॲानलाईन प्रवेशाची पळताळणी करून प्रवेश निश्चित केले जातील. हे वाचा - राज्यातील शेकडो विद्यार्थ्यांचं पुढील शिक्षण धोक्यात; श्रेणी सुधार परीक्षा नाही काही महत्त्वाच्या तारखा नोंदणी प्रक्रिया आणि अर्ज सादर करणं  - 12 ऑगस्टपासून 26 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत ऑनलाईन कागदपत्रं पडताळणी - 26 ऑगस्टपासून 30 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत तात्पुरती गुणवत्ता यादी - 30 ऑगस्टला सायंकाळी 6 वाजता विद्यार्थ्यांची तक्रार असल्यास सादर करणे - 31 ऑगस्टपर्यंत दुसरी गुणवत्ता यादी - 25 ऑगस्टला जाहीर होणार तिसरी गुणवत्ता यादी - 30 ऑगस्टला जाहीर होणार अंतिम गुणवत्ता यादी - 2 सप्टेंबरला 6 वाजता जाहीर होणार यंदाचा निकाल नेहमीच्या तुलनेत अधिक लागल्यामुळे विद्यार्थ्यांचे गुणही वाढले आहेत. त्यामुळे वाणिज्य, कला, विज्ञान शाखेतील पारंपरिक अभ्यासक्रमांच्या सर्वच अभ्यासक्रमांचे प्रवेश पात्रता गुण वाढले आहेत. म्हणूनच विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी थोडी वाट बघावी लागणार आहे.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: HSC

    पुढील बातम्या