मुंबई, 08 सप्टेंबर: स्पर्धा परीक्षा
(Competitive Exams) म्हंटलं की भल्याभल्यांच्या अंगावर काटा येतो. तरीही भारतात बहुतांश विद्यार्थी स्पर्धा परीक्षा देतात. CGL, NDA, CLAT, GATE, NEET, CAT, MAT, SSC, IAS आणि PCS अशा अनेक स्पर्धा परीक्षांची तयारी विद्यार्थी करत असतात. यासाठी निरनिराळ्या प्रकारचे क्लास लावतात. अशावेळी विद्यार्थ्यांना काही पुस्तकांची
(Books for Competitive exams) गरज असते ज्यांच्या माध्यमातून अभ्यास होऊ शकेल. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशा काही पुस्तकांबद्दल
(Books Important for Competitive exams) सांगणार आहोत जे तुम्हाला स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी नक्कीच मदत करतील. चला तर मग जाणून घेऊया.
जनरल इंग्लिश फॉर ऑल कॉम्पीटीटिव एग्जाम्स
आपल्या देशातील सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये सामान्य इंग्रजी चाचणी निश्चितपणे समाविष्ट आहे. हे एक व्यावहारिक पुस्तक आहे ज्यात इंग्रजी व्याकरणासह आपल्या सरावासाठी बरेच स्वाध्याय दिले आहेत. या पुस्तकात इंग्रजी व्याकरणाचे विविध नियम सोप्या उदाहरणांनी स्पष्ट केले आहेत. विविध स्पर्धा परीक्षांसाठी इंग्रजीचा सराव करण्यासाठी हे पुस्तक खूप उपयुक्त आहे.
हे वाचा -
Nagpur Metro Recruitment: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड नागपूर इथे इंजिनिअर्ससाठी मोठी भरती; आजच करा अप्लाय
फ़ास्ट ट्रॅक ऑब्जेक्टिव्ह अरिथमेटिक
या पुस्तकात RBI, SBI, IBPS PO, SSC, LIC, CDS आणि UPSC सारख्या सर्व स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम समाविष्ट आहे. या पुस्तकात अंकगणिताच्या मूलभूत संकल्पना आणि प्रश्न सोडवण्याच्या छोट्या युक्त्या दिल्या आहेत. त्यामुळे हे पुस्तक गणिताचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त आहे.
ऑक्सफ़ोर्ड स्टुडंट एटलस फॉर इंडिया
यूपीएससी, राज्य लोकसेवा आयोग आणि इतर अनेक स्पर्धा परीक्षा संस्थांद्वारे घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी, हे पुस्तक भारत आणि जगाच्या विविध नकाशांवर नवीनतम आणि अचूक माहिती प्रदान करते. या पुस्तकामध्ये भारतीय इतिहासाशी संबंधित 24 नकाशे आणि पर्यावरणाशी संबंधित 8 नकाशे आहेत. याशिवाय, जागतिक इतिहास, जागतिक वेळ क्षेत्र नकाशे आणि जागतिक भौगोलिक नकाशे देखील या पुस्तकात समाविष्ट केले गेले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.