नवी दिल्ली, 23 जानेवारी : देशातील लाखो उमेदवार यूपीएससी म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी जीवाचं रान करत असतात. जीवतोड मेहनत करत असतात. मात्र, अगदी मोजकेच उमेदवार त्यात उत्तीर्ण होत असतात. कनिष्का सिंह यांनीसुद्धा तब्बल 60 मॉक टेस्ट दिल्या. यानंतर त्यांनी या परीक्षेत उत्तीर्ण होत आयएफएस रँक मिळवली. आज जाणून घेऊयात, आयएफएस अधिकारी कनिष्का सिंह यांचा यशस्वी जीवनप्रवास.
कनिष्का सिंग या दिल्लीच्या रहिवासी आहेत. यूपीएससी परीक्षेच्या दुसऱ्या प्रयत्नात त्या यशस्वी झाल्या. त्यांनी मानसशास्त्र हा पर्यायी विषय निवडला होता. पहिल्या प्रयत्नात झालेल्या चुकांमधून धडा घेत दुसऱ्या प्रयत्नात त्या सुधारण्याचा पुरेपूर प्रयत्न त्यांनी केला. यासाठी कनिष्का सिंग यांनी जास्तीत जास्त मॉक टेस्टचा प्रयत्न केला. IFS कनिष्का सिंग यांनी दिल्लीतूनच शिक्षण घेतले आहे. 12वी नंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्री राम कॉलेजमधून मानसशास्त्रात पदवी संपादन केली. कनिष्का सिंगने कॉलेजच्या अभ्यासादरम्यान यूपीएससी परीक्षेत यश मिळवून सरकारी नोकरी करण्याचा निर्णय घेतला होता.
कनिष्का सिंहने 2017 मध्ये UPSC परीक्षेचा पहिला प्रयत्न केला होता. या प्रयत्नात त्यांना यूपीएससी प्रिलिम्स परीक्षाही पास करता आली नाही. यानंतर, आपल्या चुकांमधून धडा घेत त्यांनी 2018 मध्ये यूपीएससी परीक्षेसाठी दुसरा प्रयत्न केला. यामध्ये 416 वा क्रमांक मिळवून त्या आयएफएस अधिकारी बनल्या. मानसशास्त्र हा विषय त्यांनी पर्यायी विषय म्हणून निवडला होता.
हेही वाचा - Success Story : पाणीपुरी विकून मुलाला बनवले पायलट, रविकांतचा संघर्षमय प्रवास प्रेरणादायी!
तुर्कमेनिस्तानमध्ये सेवेत रुजू -
IFS कनिष्का सिंग यांनी रशियाची राजधानी मॉस्को येथे प्रशिक्षण घेऊन त्यांच्या करिअरची सुरुवात केली. त्यांचे लग्न आयएएस अधिकारी अनमोल सागर यांच्याशी झाले आहे. अनमोल सध्या गोंदिया, महाराष्ट्र येथे सेवा बजावत आहेत. तर कनिष्का सिंह या तुर्कमेनिस्तानची राजधानी अश्गाबात येथील दूतावासात तैनात आहेत. द्वितीय सचिव असण्याबरोबरच ते चान्सरीच्या प्रमुख देखील आहेत.
कनिष्क सिंग सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. इंस्टाग्रामवर त्यांचे 72 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. कनिष्का यांनी UPSC परीक्षेच्या दुसऱ्या प्रयत्नात 60 हून अधिक मॉक टेस्ट दिल्या. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी 10 मॉक टेस्ट सोडवल्या. दुसऱ्या प्रयत्नात त्याने पहिल्याच प्रयत्नात सर्व चुका सुधारल्या आणि यूपीएससीमध्ये यशाला गवसणी घातली. त्यांचा हा प्रवास यूपीएससीच्या उमेदवारांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Inspiring story, Job, Success story, Upsc, Upsc exam