मुंबई, 03 ऑगस्ट : साउथ सेंट्रल रेल्वेनं ग्रुप सी पदांसाठी नोकरीसाठी अर्ज मागवलेत. इच्छुक आणि योग्य उमेदवारांनी scr.indianrailways.gov.in या ऑफिशियल वेबसाइटवर क्लिक करावं. ऑनलाइन अर्ज 26 ऑगस्टपर्यंत करू शकता. सर्व डिटेल्स वेबसाइटवर मिळतील. ते पाहूनच अर्ज करावा. नाही तर तो अर्ज स्वीकारला जाणार नाही, असं रेल्वेनं म्हटलंय.
Railway Recruitment 2019 - पदं आणि पदसंख्या
अॅथलेटिक्स 4, बॉल बॅडमिंटन 1, बास्केटबॉल 2, बॉक्सिंग 1, शतरंज 1, हँडबॉल 2, हॉकी 1, कबड्डी 2, टेनिस 1, व्हाॅलिबॉल 2, वेटलिफ्टिंग 2
नोकरीसाठी वयाची मर्यादा
कमीत कमी - 18 वर्ष
जास्तीत जास्त - 25 वर्ष
अर्जाची फी
सर्वसामान्यांना 500 रुपये आणि ज्यांना आरक्षण आहे अशा उमेदवारांना 250 रुपये.
याआधी तुम्ही ऑफिशियल वेबसाइट scr.indianrailways.gov.in वर जा. त्यानंतर अप्लाय लिंकवर क्लिक करा. तिथे Group C vacancy साठी अर्ज करा. मग सगळी माहिती एंटर करा. अर्ज केलेल्या फाॅर्मची एक काॅपी तुमच्याकडे ठेवा.
तसंच राज्य सरकार लवकरच रोजगार निर्मिती करतंय.राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन सरकार लवकरच रोजगाराची योजना सुरू करतेय. चिफ मिनिस्टर एम्पलाॅयमेंट जनरेशन प्रोग्राम ( CMEGP ), मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना असं या योजनेचं नाव आहे. या योजनेअंतर्गत पुढच्या 5 वर्षात 10 लाख नोकऱ्या निर्माण केल्या जातील. या योजनेअंतर्गत 10 हजार अति छोट्या, लहान आणि मध्यम आकाराच्या इंडस्ट्रियल युनिटला प्रत्येकी 15 लाख रुपये दिले जातील. त्याबदल्यात दर वर्षी या उद्योगांकडून 2 लाख नोकऱ्या दिल्या जातील.
पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेवरूनच या योजनेनं प्रेरणा घेतलीय. या योजनेत महाराष्ट्रातून 16 हजारांनी अर्ज केलेत. खरं तर लक्ष्य होतं 5 हजाराचं. याचा अर्थ बेरोजगारांची संख्या जास्त आहे. उद्योगखात्यानं मिळवलेल्या माहितीनुसार जवळजवळ 40 लाख बेरोजगार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत बऱ्याच जणांना नोकरीची संधी आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा