मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

जॉबकरिता ऑनलाईन इंटरव्ह्यू देताना परफेक्ट असावा लुक आणि मेकअप

जॉबकरिता ऑनलाईन इंटरव्ह्यू देताना परफेक्ट असावा लुक आणि मेकअप

ऑनलाइन इंटरव्ह्यू असला तरी तुम्ही प्रोफेशनल दिसणं अपेक्षित आहे. Online Interview च्या वेळी काय करा, काय टाळा?

ऑनलाइन इंटरव्ह्यू असला तरी तुम्ही प्रोफेशनल दिसणं अपेक्षित आहे. Online Interview च्या वेळी काय करा, काय टाळा?

ऑनलाइन इंटरव्ह्यू असला तरी तुम्ही प्रोफेशनल दिसणं अपेक्षित आहे. Online Interview च्या वेळी काय करा, काय टाळा?

नवी दिल्ली, 28 डिसेंबर : कोरोनामुळे (Coronavirus) जगभरातील अनेक गोष्टींमध्ये बदल झाल्याचे दिसून येत आहे. आता लोक वर्क फ्रॉम होमला (Work from Home) प्राधान्य देत आहेत. तसंच विवाह सोहळ्यांपासून नोकरीसाठी कर्मचारी निवडीपर्यंत सर्व गोष्टी ऑनलाईन (Online) पद्धतीने होत आहेत. कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ऑफिसेस सुरू करणं सुरक्षित नसल्याची भूमिका अद्यापही कायम आहे.  मात्र याचा अर्थ कामकाजाशी तडजोड करणे असा नाही. आता कंपन्या ऑनलाईन पद्धतीने नोकऱ्या ऑफर करीत आहेत. तुम्ही देखील अशाच पद्धतीने एखाद्या कंपनीकडे नोकरीसाठी अर्ज केला असेल आणि तुम्हाला मुलाखतीसाठी कॉल आला असेल अशावेळी तुम्ही ऑनलाइन मुलाखतीस (Online Interview) कॅज्युअली घेऊ नका. कारण हाच इंटरव्ह्यू तुमचे भविष्य ठरवणार आहे.

असंही होऊ शकते, की या ऑनलाइन मुलाखतीदरम्यान तुम्ही एखादी चूक करुन बसाल आणि तुम्हाला नोकरीला मुकावं लागेल. घरातून काम करताना आपल्याला अशा छोट्या चुका लक्षात येत नाहीत. जाणून घेऊया अशा लहान लहान चुकांविषयी की ज्या तुम्हाला ऑनलाईन इंटरव्ह्यू दरम्यान टाळता येऊ शकतील.

असा असावा पेहराव (आऊटफिट)

आपण जरी ऑनलाइन इंटरव्हयू देत असलात तरी आउटलूक किंवा लूकबाबत (look) कोणतीही तडजोड करु नका. जर तुम्ही तुमच्या लुककडे पुरेसे लक्ष दिले नाही तर तुम्ही नोकरीसाठी गंभीर नाहीत, असा समज इंटरव्ह्यु घेणाऱ्या व्यक्तीचा होऊ शकतो. त्यामुळे ती व्यक्ती तुम्हाला अनप्रोफेशनल देखील समजू शकते आणि नोकरी तुमच्या हातातून जाऊ शकते. त्यामुळे इंटरव्ह्युसाठी तुमचा पेहराव (Outfit) अगदी फॉर्मल असला पाहिजे. कपड्यांची रंगसंगती अचूक असली पाहिजे.

असा असावा मेकअप

मुलगा असो वा मुलगी ऑनलाईन इंटरव्ह्यूसाठी तुमचा लूक योग्य पध्दतीचाच असला पाहिजे. तुमचा मेकअप (Make up) तुम्ही परिधान केलेल्या कपड्यांशी सुसंगत असावा. तसेच ज्या खोलीत बसून तुम्ही इंटरव्हयू देत आहात त्या खोलीतील प्रकाश, तुमच्या पार्श्वभूमीला असलेला रंग आणि तुमचा मेकअप यात विसंगती नसावी. इंटरव्ह्यूसाठी तुमचा मेकअप अगदी भडकही नको किंवा अगदीच तुम्ही झोपेतून उठला आहात असा भासवणाराही नसावा. आपल्या जॉब प्रोफाईलनुसारच आपला मेकअप आणि पेहराव असावा.

हेडफोन वापरा

जरी तुमच्या फोन किंवा लॅपटापची ऑडिओ क्वॉलिटी चांगली असली तरी यावेळी हेडफोनचा (Head Phone) वापर करणे आवश्यक आहे. यामुळे तुम्हाला आवाजाची गुणवत्ता चांगली मिळेल. जर तुमच्याकडे हेडफोन नसेल तर तुम्हाला प्रत्येक गोष्ट वारंवार सांगावी लागेल आणि ही बाब कोणत्याही एचआर विभागाला आवडणारी नाही.

खोलीच्या लायटिंगकडे लक्ष द्या

जर तुमचा व्हिडीओ इंटरव्ह्यू दिवसा आहे म्हणून तुम्ही तुमच्या रुममधील लाईटसकडे दुर्लक्ष केले तर ही बाब तुम्हाला महागात पडू शकते. भलेही तुम्ही नैसर्गिक प्रकाशाला प्राधान्य दिले असले तरी तुम्हाला आर्टिफिशिअल लाईटसची व्यवस्था करावीच लागणार आहे. तसेच यावेळी घरातील लहान मुले आणि पाळीव प्राण्यांच्या आवाज तुमच्या खोलीपर्यंत पोहोचणार नाही, याचीही दक्षता तुम्ही घेतली पाहिजे.

First published:

Tags: Corona, Corona virus in india, Coronavirus, Job, Work from home