राज्य मराठी विकास संस्थेत भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज

राज्य मराठी विकास संस्थेत भरती, 'या' पदांसाठी करा अर्ज

Jobs, Career - नोकरी शोधताय? राज्यात नोकरीची चांगली संधी आहे. जाणून घ्या त्याबद्दल

  • Share this:

मुंबई, 13 ऑगस्ट : तुम्हाला सरकारी नोकरी करायची असेल तर चांगली संधी आहे. राज्य मराठी विकास संस्थेत विविध पदांवर भरती सुरू आहे. एकूण 24 जागा आहेत. कम्प्युटर अधिकारी, प्रकल्प सह-व्यवस्थापक, सहल-पर्यटन संयोजक, सहाय्यक ग्रंथपाल, बृहन्महाराष्ट्र अधिकारी, प्रशिक्षण सहाय्यक, आस्थापना सहाय्यक, विभागीय समन्वयक, शिपाई, ग्रंथपाल, सहाय्यक ग्रंथपाल, ग्रंथालय सहाय्यक अशा पदांवर भरती करायची आहे.

शैक्षणिक पात्रता

शिपाई पदासाठी 10वी उत्तीर्ण हवं आणि ग्रंथपाल सहाय्यक पदासाठी 12 वी उत्तीर्ण हवं. बाकीच्या पदांसाठी त्या त्या विषयाशी संबंधित पदवी हवी. कम्प्युटरची माहिती हवी.

सोन्याच्या दरात घसरण, चांदी महागली, 'हे' आहेत मंगळवारचे दर

अर्जाची फी

खुल्या वर्गासाठी 300 रुपये आणि मागासवर्गीयांसाठी 150 रुपये आहे.

वयाची अट

उमेदवाराचं वय 45 वर्षापर्यंत हवं.

ऑनलाइन अर्ज भरण्याची शेवटची तारीख - 17 ऑगस्ट 2019

सातव्या वेतन आयोगाप्रमाणे मिळणार पगार, 80 हजारांनी सुरुवात, 'इथे' आहे संधी

लेखी परीक्षा आणि मुलाखत पुण्याला फर्ग्युसन काॅलेजमध्ये घेतली जाईल. 25 ऑगस्ट 2019 रोजी मुलाखत आणि लेखी परीक्षा होईल.

अधिक माहितीसाठी http://rmvs.in/ इथे क्लिक करा.

तसंच राज्य सरकार लवकरच रोजगार निर्मिती करतंय.राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन सरकार लवकरच रोजगाराची योजना सुरू करतेय. चिफ मिनिस्टर एम्पलाॅयमेंट जनरेशन प्रोग्राम ( CMEGP ), मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना असं या योजनेचं नाव आहे. या योजनेअंतर्गत पुढच्या 5 वर्षात 10 लाख नोकऱ्या निर्माण केल्या जातील. या योजनेअंतर्गत 10 हजार अति छोट्या, लहान आणि मध्यम आकाराच्या इंडस्ट्रियल युनिटला प्रत्येकी 15 लाख रुपये दिले जातील. त्याबदल्यात दर वर्षी या उद्योगांकडून 2 लाख नोकऱ्या दिल्या जातील.

आधार कार्डाच्या मदतीनं 'अशी' बुक करा ट्रेनची तिकिटं, 'असा' होतो फायदा

पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेवरूनच या योजनेनं प्रेरणा घेतलीय. या योजनेत महाराष्ट्रातून 16 हजारांनी अर्ज केलेत. खरं तर लक्ष्य होतं 5 हजाराचं. याचा अर्थ बेरोजगारांची संख्या जास्त आहे. उद्योगखात्यानं मिळवलेल्या माहितीनुसार जवळजवळ 40 लाख बेरोजगार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत बऱ्याच जणांना नोकरीची संधी आहे.

नांगरणी स्पर्धेत उधळला बैल, पुढे काय घडलं पाहा हा थरारक VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: jobs
First Published: Aug 13, 2019 07:19 PM IST

ताज्या बातम्या