राष्ट्रीय आरोग्य अभियानात डाॅक्टर, नर्स यांना नोकरीची संधी, इथे करा अर्ज

राष्ट्रीय आरोग्य अभियानात डाॅक्टर, नर्स यांना नोकरीची संधी, इथे करा अर्ज

National Health Mission - राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक इथे 305 जागांवर भरती आहे.

  • Share this:

मुंबई, 06 ऑगस्ट : तुम्ही वैद्यकीय प्रोफेशनमध्ये आहात? मग तुम्हाला नोकरीची संधी आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नाशिक इथे 305 जागांवर भरती आहे. सुपर स्पेशॅलिस्ट, स्पेशॅलिस्ट, स्टाफ नर्स, मेडिकल ऑफिसर, ज्युनियर इंजिनियरिंग, प्रोग्रॅम कोऑर्डिनेटर, काॅन्सिलर अशा पदांसाठी जागा भरणं आहे.

वयाची अट

MBBS आणि  स्पेशलिस्ट या पदासाठी 70 वर्षांपर्यंत वयाची अट आहे. तर नर्स आणि टेक्निशिअनसाठी  65 वर्षांपर्यंत आहे.इतर पदांसाठी  38 वर्षांपर्यंत आहे. तसंच मागासवर्गीयांसाठी 5 वर्ष सूट आहे.

आठवड्याच्या सुरुवातीला सोन्याचा भाव कडाडला, 'हे' आहेत आजचे दर

अर्जाची फी

खुल्या वर्गासाठी 150 रुपये फी आहे. तर आरक्षण असलेल्यांना 100 रुपये फी आहे.

नोकरीचं ठिकाण नाशिक आहे.

मुलाखतीचं ठिकाण - हाॅस्पिटल ट्रेनिंग सेंटर, जिल्हा रुग्णालय आवार, जिल्हा प्रशिक्षण केंद्रासमोर, नाशिक

मोदी सरकार देतेय 1500 रुपयांपर्यंत स्वस्त सोनं खरेदीची संधी, होणार हे 3 फायदे

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 8 ऑगस्ट 2019

अधिक माहितीसाठी www.nrhm.maharashtra.gov.in इथे क्लिक करा.

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ऑफिसर पदासाठी भरती, 'या' उमेदवारांनी करा अर्ज

तसंच, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात 204 जागांवर भरती आहे. क्लार्क आणि शिपाई पदासाठी ही व्हेकन्सी आहे.

पद आणि पद संख्या

क्लार्क पदासाठी 128 जागांवर व्हेकन्सी आहे. तर शिपाई पदासाठी 76 जागा आहेत.

शैक्षणिक पात्रता

क्लार्क पदासाठी पदवीधर आणि इंग्लिश टायपिंग आवश्यक आहे. तसंच MS-CIT किंवा समतुल्य शिक्षण हवं.

वयाची मर्यादा

उमेदवाराचं वय 1 ऑगस्ट 2019 रोजी 18 ते 38 वर्षापर्यंत हवं.  मागासवर्गीयांसाठी 5 वर्ष सूट आहे.

अर्जाची फी

क्लार्क पदासाठी 10 रुपये आणि शिपाई पदासाठी 50 रुपये आहे.

नोकरीचं ठिकाण नागपूर आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2019 आहे.

विरोधकांनी आम्हाला शिकवू नये, अमित शहांचं राज्यसभेतलं UNCUT भाषण

Published by: Sonali Deshpande
First published: August 6, 2019, 6:26 AM IST
Tags: jobs

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading