Home /News /career /

SBI CBO Result 2020: ऑनलाईन परीक्षा निकाल जाहीर, उत्तीर्ण उमेदवारांची यादी पाहा एका क्लिकवर!

SBI CBO Result 2020: ऑनलाईन परीक्षा निकाल जाहीर, उत्तीर्ण उमेदवारांची यादी पाहा एका क्लिकवर!

SBI CBO result 2020

SBI CBO result 2020

SBI CBO मुलाखत ही 100 गुणांची असेल आणि उमेदवारांना नियुक्तीसाठी निवडण्यासाठी किमान पात्रता गुण मिळवावे लागतील.

नवी दिल्ली, 29 जानेवारी: स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank Of India) सर्कल बेस्ड ऑफिसर्स (Circle Based Officer) पदासाठी घेतलेल्या परीक्षेच्या निकालाची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. एसबीआयने 'सीबीओ निकाल 2020' (CBO Result 2020) आपल्या अधिकृत वेबसाइट sbi.co.in वर जाहीर केला आहे. एसबीआयने सीबीओ निकाल २०२० मध्ये लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या आणि मुलाखतीच्या फेरीसाठी निवडलेल्या उमेदवारांचे रोल नंबर समाविष्ट केले आहेत. SBI ने 2 नोव्हेंबर 2020 रोजी सीबीओच्या भरतीसाठी लेखी परीक्षा घेतली होती. सीबीओच्या 3850 पदासाठी ही लेखी परीक्षा झाली होती. ज्या उमेदवारांनी एसबीआय सीबीओ पदासाठी लेखी परीक्षा दिली होती. ते एसबीआयच्या वेबसाईटवर जाऊन शॉर्ट लिस्टेड उमेदवारांच्या यादीमध्ये त्यांचा रोल नंबर शोधून निकाल तपासू शकतात. जे उमेदवार सीबीओ परिक्षेमध्ये उत्तीर्ण झाले आहेत ते पुढील फेरीसाठी म्हणजे मुलाखतीसाठी पात्र ठरतील. एसबीआय सीबीओ मुलाखतीत १०० गुणांचा समावेश असणार आहे. नियुक्तीसाठी निवड होण्यासाठी उमेदवारांना किमान पात्रता गुण मिळवावे लागणार आहेत. एसबीआय सीबीओ निकाल 2020 असा पाहा. - 1. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. - sbi.co.in 2. बेवसाईटच्या होमपेजवरील डावीकडील कोपऱ्यात असलेल्या ‘Career’ टॅबवर क्लिक करा. 3. नवीन पेज उघडेल. 'latest announcement' सेक्शनवर जा. ‘List of provisionally selected candidates for the interview’ या लिंकवर क्लिक करा. 4. SBI CBO result 2020 हे पीडीएफ फाइलमध्ये दिसेल. त्यामध्ये शॉर्ट लिस्टेड उमेदवारांचा रोल नंबर तुम्हाला दिसेल. 5. या लिस्टमध्ये उमेदवारांनी आपला रोल नंबर शोधून निकाल तपासावा. पुढील संदर्भासाठी उमेदवारांनी SBI CBO result 2020 ची प्रिंटआऊट घ्यावी. उमदेवार याठिकाणी दिलेल्या लिंकद्वारे आपला निकाल थेट पाहू शकलीत. एसबीआयने देशभरातील आपल्या शाखेतील सर्कल बेस्ड ऑफिसर्स (CBO) या पदासाठीच्या 3850 रिक्त जागांसाठी भरतीची प्रक्रिया राबवली आहे. एसबीआय सीबीओ मुलाखत फेरीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना सहा महिन्यांच्या कालावधीसाठी सीबीओ म्हणून नियुक्त केले जाईल. नियुक्त केलेल्या उमेदवारांना 23,700 ते 42,020 हजार ऐवढे वेतन दिले जाईल.
Published by:news18 desk
First published:

Tags: Jobs, SBI, Sbi bank job, SBI Bank News

पुढील बातम्या